कोळंबीसह ओल्या बोंबीलची आवक वाढली; मासळी बाजारात ग्राहकांची गर्दी; खवय्यांमध्ये उत्साहाचे वातावरण  प्रातिनिधिक छायाचित्र
महाराष्ट्र

कोळंबीसह ओल्या बोंबीलची आवक वाढली; मासळी बाजारात ग्राहकांची गर्दी; खवय्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

मुरूड तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने आणि सध्या ढगाळ वातावरणासह अधूनमधून ऊन पडत असल्याने मासेमारीला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे मुरूडच्या मासळी बाजारात कोळंबी आणि ओले बोंबील मोठ्या प्रमाणात दाखल होत असून, स्वस्त दरामुळे ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे.

Swapnil S

मुरूड-जंजिरा : मुरूड तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने आणि सध्या ढगाळ वातावरणासह अधूनमधून ऊन पडत असल्याने मासेमारीला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे मुरूडच्या मासळी बाजारात कोळंबी आणि ओले बोंबील मोठ्या प्रमाणात दाखल होत असून, स्वस्त दरामुळे ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे.

मुरूड तालुक्यात यंदा आतापर्यंत सुमारे दोन हजार मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या कधी कडक ऊन, तर कधी दाट ढग असे वातावरण असले तरी पावसाचा जोर नाही. त्यामुळे समुद्रात मासेमारी सुरळीत सुरू आहे.

हंगामाच्या सुरुवातीला पापलेट मोठ्या प्रमाणात मिळत होते; मात्र आता त्याची आवक घटल्याने दर वाढले आहेत. दुसरीकडे लहान व मध्यम आकाराची सुरमई मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून, तिचे दर ग्राहकांना परवडणारे आहेत.

चिकन, मटणला वर्दळ कमी

सध्या मुरूडच्या मासळी बाजारात मोठी कोळंबी आणि ओले बोंबील मुबलक प्रमाणात येत आहेत. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात आढळणारी कोळंबी यंदा लवकर बाजारात दाखल झाल्याने खवय्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सध्या श्रावण महिना सुरू असल्याने चिकन आणि मटणाच्या दुकानांमध्ये ग्राहकांची वर्दळ तुलनेने कमी आहे. त्यामुळे मासळी बाजारात गर्दी वाढली आहे. मुंबईच्या बाजारपेठेतही विविध ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात मासळी विक्रीसाठी येत असल्याने आवक मुबलक असल्याचे चित्र आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

राहुल गांधींची कॉपी करण्याचा फडणवीसांचा प्रयत्न फसला! सपकाळ यांची टीका

दिल्लीतील मंत्र्यांच्या बंगल्यांच्या देखभाल खर्चात विक्रमी वाढ

Pune : रोहित पवार यांच्या पीएच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू

लोकशाहीमुळेच मुख्यमंत्रीपदापर्यंत पोचलो, देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; 'जेन झी'शी केला संवाद

बांगलादेशात हिंदू कुटुंबातील ४ जणांची हत्या