Nagpur : वीस लाख रुपयांचा औषध साठा जप्त X
महाराष्ट्र

Nagpur : वीस लाख रुपयांचा औषध साठा जप्त

नागपूर शहरातील न्यू एरा हॉस्पिटलच्या मेडिकल स्टोअरवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत विनापरवाना साठवलेला २० लाखांहून अधिक किमतीचा औषधसाठा जप्त करण्यात आला आहे.

Swapnil S

नागपूर : शहरातील न्यू एरा हॉस्पिटलच्या मेडिकल स्टोअरवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत विनापरवाना साठवलेला २० लाखांहून अधिक किमतीचा औषधसाठा जप्त करण्यात आला आहे. एफडीएने रुग्णालयाच्या बेसमेंटमधून हा औषधांचा साठा जप्त केला असून, संबंधित जागेसाठी वैध औषध विक्री परवाना नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. औषधांच्या खरेदी-विक्रीची कागदपत्रे सादर करण्यात अपयश आल्याने ही कारवाई करण्यात आली. प्रशासनाने औषधांचे दोन नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवले असून, औषधे आणि सौंदर्यप्रसाधने कायद्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई प्रस्तावित आहे.

प्रिस्क्रिप्शन न दिल्याने प्रकरण निदर्शनास

रुग्णांना रुग्णालयाशी संलग्न मेडिकलमधूनच औषधे घेण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. प्रिस्क्रिप्शनची प्रत रुग्ण किंवा नातेवाईकांना न दिल्याचे या तपासणीत निदर्शनास आले आहे. संगणकीय इंडेंटद्वारे थेट फार्मसीकडे औषध मागवण्याची पद्धत यातून उघड झाली आहे. रुग्णांना बाहेरून औषधे घेण्याची मुभा देणाऱ्या एफडीएच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. तसेच, रुग्णांना निवडीचा अधिकार असल्याचा फलकही रुग्णालयात आढळलेला नाही.

तपासणीत अनेक त्रुटी उघड

तपासणीत औषध विक्री अनेक नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून आले आहे. यात प्रामुख्याने केमिस्ट अँड ड्रगिस्टचा नामफलक नसल्याचे आढळले आहे. याशिवाय, मुदतबाह्य औषधांसाठी स्वतंत्र व्यवस्था नसल्याचा ठपका ठेवण्यात आला असून, 'शेड्यूल एच-१' औषधांचासाठा आणि नोंदीत तफावत आढळली आहे. तपासणी पुस्तक (फॉर्म-३५) उपलब्ध नसल्याचेहीदर्शनास आल्याने, रुग्णालयाला कारणे दाखवा नोटीस बजावून पुढील कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. रुग्णांना विशिष्ट मेडिकलमधून औषधे घेण्यास सक्ती झाल्यास तक्रार करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Mobile SIM Rules: आजपासून सिम कार्ड खरेदीचा नवा नियम लागू! एका व्यक्तीच्या नावावर फक्त 'इतकेच' नंबर चालणार

साखरेची दर घसरण सुरू; सरकारच्या साठा मर्यादेचा परिणाम, साखर फॅक्टरी फेडरेशनचे अध्यक्ष नाईकनवरे यांची माहिती

Mumbai : 'आम्ही शाळेतच गेलो नाही, मग मराठी कशी बोलणार?'; भाषेच्या सक्तीविरोधात रिक्षाचालकांचा ३ दिवसांचा संप

राज्यांनी PNG ला गती द्यावी; केंद्र सरकारचा राज्यांना आग्रह, जिल्हास्तरीय अधिकारी नेमा

दिल्लीत मुसळधार पावसाचा तडाखा; खराब हवामानामुळे २६ उड्डाणे रद्द, १५ विमानांचे बदलले मार्ग