महाराष्ट्र

Nagpur Online Fraud : व्यापाऱ्याची 58 कोटींची फसणवूक ; आरोपीच्या घरी धाड टाकताच सापडलं कोट्यवधींचं घबाड

नागपूर गुन्हे शाखा आणि गोंदीया गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी अनंत जैनच्या गोंदियातील घरावर छापा टाकल्यावर कोट्यावधी रुपये आढळून आले आहेत.

नवशक्ती Web Desk

ऑनलाईन गेमच्या माध्यमातून नागपूरातील व्यापाऱ्याची तब्बल 58 कोटींची फसवणूक झाल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणातील आरोप हा गोंदीया येथील आहे. अनंत जैन असं आरोपीचं नाव असून तो फरार झाला आहे. पोलिसांना अनंत जैन याच्याघरी छापा मारला असून यावेळी कोट्यावधींची रक्कम आढळून आली आहे. अनंत जैनच्या घरी छापा मारल्यावर 18 कोटींची रोकड, 15 किलो सोन आणि 20 किलो चांदी आढळून आली आहे. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी हा क्रिकेट सट्टेबाज असून नागपूच्या इतिहासातील ही सर्वात मोठी ऑनलाईन फसवणुकीची घटना आहे.

फिर्यादी आणि आरोपी एकमेकांच्या परिचयाचे असून आरोपी 2021 सालापासून ही फसवणुक करत आहे. तक्रारदार व्यापारी हा व्यापार करण्याच्या माध्यमातून आरोपीच्या संपर्कात आला. यानंतर आरोपीने व्यापाऱ्याला ऑनलाईन गेमिंगमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसा असल्याचं सांगितलं. आरोपीने व्यापाऱ्याला 'डायमंड एक्सचेंज डॉट कॉम' या लिंक पाठवून त्याचं लॉग इन पासवर्ड तयार करुन ऑनलाईन बेटिंग सुरु केलं.

व्यापारीला सुरुवातीला 8 लाख रुपये जमा झाल्याचं दिसलं. यानंतर व्यापारी जुगार खेळायला लागला. व्यापारी सुरुवातीला जिंकत गेला. मात्र, नंतर 58 लाख रुपये हरला. आरोपी अनंत जैन हा सतत जिंकत असल्याने व्यापाऱ्याला संशय आला. त्याने पैसे परत मागितल्यने आरोपीने ते देण्यास नकार दिला. तसंच याची वाच्यता कुठे केल्यास अपहरण करुन जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर व्यापाऱ्याने उर्वित चाळीस लाख देखील आरोपी अनंत जैन याला दिले. यानंतर व्यापाऱ्याने पोलिसा तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी ऑनलाईन फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

यानंतर नागपूर गुन्हे शाखा आणि गोंदीया गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी अनंत जैनच्या गोंदियातील घरावर छापा टाकला. यावेळी आरोपीच्या घरात18 कोटींची रोकड, 15 किलो सोनं आणि 20 किलो चांदी जप्त करण्यात आली. ओरोपी अनंत जैन मात्र फरार झाला आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी