नागपूर SBL कंपनी स्फोटप्रकरण : २१ अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा, ९ जणांना अटक; मृतांची संख्या १९ वर 
महाराष्ट्र

नागपूर SBL कंपनी स्फोटप्रकरण : २१ अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा, ९ जणांना अटक; मृतांची संख्या १९ वर

'एसबीएल एनजीं लिमिटेड'मधील स्फोट प्रकरणात कंपनीच्या २१ वरिष्ठ अधिकाऱ्यांवर भारतीय न्याय संहितेच्याअंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी आतापर्यंत ९ जणांना अटक करण्यात आली आहे.

Swapnil S

नागपूर : 'एसबीएल एनजीं लिमिटेड'मधील स्फोट प्रकरणात कंपनीच्या २१ वरिष्ठ अधिकाऱ्यांवर भारतीय न्याय संहितेच्याअंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी आतापर्यंत ९ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून याप्रकरणी दोषी असलेल्या इतरांचाही शोध सुरू आहे. दरम्यान, या स्फोटात मृत पावलेल्यांची संख्या १९ वर पोहोचली आहे.

नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथे १ मार्च २०२६ रोजी सकाळी एसबीएल एनर्जी लिमिटेड कंपनीमध्ये मोठा स्फोट झाला होता. दारुगोळा आणि त्यापासून डेटोनेटरसह इतर स्फोटक बनवणाऱ्या कंपनीत हा मोठा स्फोट झाला. या भीषण स्फोटातील एका जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मृतांची संख्या आता १९ झाली आहे.

राज्याचे फडणवीस सखोल मुख्यमंत्री देवेंद्र यांनी या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर तपासाअंती एसबीएल एनर्जीमध्ये झालेल्या स्फोटप्रकरणी पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. एसबीएल एनर्जी कंपनीचे संचालक, प्रोजेक्ट मॅनेजर, प्लांट मॅनेजर, सुपरवायझर, सेफ्टी ऑफिसरसह २१ वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी याप्रकरणी ठोस कारवाई करत ९ जणांना अटकही केली असून इतरांचा शोध घेतला जात आहे.

पेन्शनधारकांना अधिक परतावा; नव्या गुंतवणूक पर्यायांचा समावेश करण्यासाठी PFRDA ची समिती स्थापन

आता गावकऱ्यांना मिळणार मोफत मिळकत पत्रिका; सनद फी माफ करण्याची महसूल मंत्री बावनकुळेंची घोषणा

Mumbai : दादर ते सिद्धिविनायक मंदिर गारेगार प्रवास; शनिवारपासून २० ते २२ मिनिटांच्या अंतराने AC बससेवा

ठाणे आग: सहाय्यक आयुक्तांना निलंबित करा; आमदार केळकर यांची मागणी

कल्याण रेल्वे स्थानक मारहाण प्रकरण : राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता