महाराष्ट्र

नांदेड बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता; न्यायालयाचा तब्बल १८ वर्षांनी निकाल

६ एप्रिल २००६ रोजी नांदेड शहरातील पाटबंधारे नगर भागातील राजकोंडवार यांच्या घरात भीषण स्फोट झाला होता.

Swapnil S

नांदेड : ६ एप्रिल २००६ रोजी नांदेडच्या पाटबंधारे नगर येथे राजकोंडवार यांच्या घरी मोठा स्फोट झाला होता. याप्रकरणी १२ जणांविरोधात खटला दाखल करण्यात आला होता. याप्रकरणाचा आता तब्बल १८ वर्षांनी निकाल लागला असून, सर्व १२ आरोपींची नांदेड जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सीव्ही मराठे यांनी शनिवारी निर्दोष मुक्तता केली आहे. २००६ च्या बॉम्बस्फोट प्रकरणातून जिल्हा सत्र न्यायालयाने सर्व १२ जणांची निर्दोष मुक्तता केली.

नांदेड शहरातील पाटबंधारे नगर येथे ६ एप्रिल २००६ रोजी झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व १२ आरोपींची नांदेड जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सीव्ही मराठे यांनी शनिवारी निर्दोष मुक्तता केली. या स्फोटातच दोन आरोपींचा मृत्यू - झाला होता. दहा जणांवर खटला सुरू होता. तब्बल १८ वर्षानंतर या बहुचर्चित प्रकरणाचा निकाल शनिवारी आला.

याप्रकरणी सीबीआयने जवळपास २ हजार पानांचे आरोपपत्र तयार केले होते. ६ एप्रिल २००६ रोजी नांदेड शहरातील पाटबंधारे नगर भागातील राजकोंडवार यांच्या घरात भीषण स्फोट झाला होता. त्यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या स्फोटात नरेश राजकोंडवार आणि हिमांशू पानसे यांचा जागीच मृत्यू झाला. मारोती वाघ, योगेश देशपांडे, गुरुराज टोप्टीवार, राहुल पांडे हे गंभीर जखमी झाले.

४९ साक्षीदारांची तपासणी

या खटल्याचा निकाल शनिवारी नांदेड न्यायालयात सुनावण्यात आला. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने या प्रकरणात ४९ साक्षीदार तपासले. त्यातच पाटबंधारे नगरमधील त्या घरात बॉम्बस्फोट झाल्याचे सीबीआयला सिद्ध करता आले नाही. त्या ठिकाणी फटाके फुटल्याचे लक्षात घेऊन न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या खटल्यात बचाव पक्षातर्फे वकील नितीन रुणवाल यांनी काम पाहिले. राहुल पांडे, संजय चौधरी, रामदास मुळंगे, मारोती वाघ, योगेश रवींद्र देशपांडे, गुरुराज तुप्तेवार, मिलिंद एकताटे, मंगेश पांडे, राहुल धावडे अशी आरोपींची नावे आहेत. या सर्व आरोपींची आज न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

Women’s World Cup : ऐतिहासिक विजेतेपदाचे लक्ष्य; भारत-दक्षिण आफ्रिका महिला संघांत आज अंतिम लढत

Mumbai : एल्फिन्स्टन पूलाचे पाडकाम आज रात्रीपासून

Maharashtra Rain : पाऊस सुरूच राहण्याची शक्यता

Satyacha Morcha Mumbai : मविआचा एल्गार; उद्धव, राज, शरद पवार यांच्यासह विरोधकांचे शक्तिप्रदर्शन

Satyacha Morcha : मुंबईत सत्याचा जयघोष! सीएसएमटी स्थानक परिसर घोषणांनी दणाणला; हजारोंच्या संख्येने पक्षांचे कार्यकर्ते सहभागी