महाराष्ट्र

नांदेडमध्ये प्रसादातून २ हजार जणांना विषबाधा

संत बाळूमामा यांच्या सप्ताह कार्यक्रमाच्या प्रसादातून सुमारे २ हजार भाविकांना मंगळवारी अन्न विषबाधा झाली.

Swapnil S

प्रतिनिधी/नांदेड : लोहा तालुक्यातील कोष्ठवाडी येथे संत बाळूमामा यांच्या सप्ताह कार्यक्रमाच्या प्रसादातून सुमारे २ हजार भाविकांना मंगळवारी अन्न विषबाधा झाली. जिल्हा प्रशासनाने तातडीने धाव घेवून आरोग्य विभाग, शासकीय वैद्यकीय रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, लोहा येथील उपजिल्हा रुग्णालय, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय येथे रुग्णांना तातडीने हलवून युद्धपातळीवर उपचार केले.

मध्यरात्रीनंतर अचानक रुग्णांची संख्या लक्षात घेवून कुठेही न डळमळता आरोग्य विभागाने रुग्णांवर केलेले उपचाराचे व्यवस्थापन हे महत्वाचे ठरले. तत्काळ सर्व रुग्णांना रुग्णालयात हलविल्यामुळे कोणतीही जीवीत हानी न होता सर्व रुग्णांना या विषबाधेतून बाहेर काढण्यात आरोग्य विभागाला यश आल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

सद्यस्थितीत बुधवारी सायंकाळी सहा वाजता वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सुमारे १९ रुग्ण, जिल्हा रुग्णालय नांदेड येथे ६०, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयात ५०, लोहा येथील उपजिल्हा रुग्णालयात ७० व खासगी रुग्णालयात सुमारे १५० रुग्ण असे सुमारे ५०० रुग्ण उपचार घेत आहेत. उर्वरित सर्व रुग्णांवर उपचार होऊन ते सुखरुप असल्याची माहिती डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

ठाकरेंचे वलय संपले का?