(संग्रहित छायाचित्र)
महाराष्ट्र

नांदेड-हैदराबाद-अहमदाबाद विमानसेवा ३१ मार्चपासून

येत्या ३१ मार्चपासून पूर्वत सुरू होत आहे. अहमदाबाद - नांदेड ही विमानसेवा प्रत्येक आठवड्यातील सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि...

Swapnil S

नांदेड : नांदेडकरांसाठी बहुप्रतिक्षित असलेल्या नांदेड - हैद्राबाद आणि नांदेड - अहमदाबाद विमानसेवेला येत्या ३१ मार्चपासून ही विमानसेवा नियमितपणे सुरू होणार असल्याची माहिती खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आली आहे. शिवाय बेंगलोर - नांदेड - जालिंदर विमानसेवाही लवकरच सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील उडे देश का आम आदमी अर्थात उड्डाण या महत्वकांक्षी विमानसेवेतील नांदेड येथून अनेक विमानसेवा पूर्ववत सुरू होत आहेत. यासाठी खा. चिखलीकर यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांकडे आणि केंद्रीय उड्डाण मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले असून, येत्या ३१ मार्चपासून पूर्वत सुरू होत आहे. अहमदाबाद - नांदेड ही विमानसेवा प्रत्येक आठवड्यातील सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि रविवारी सुरू होणार आहे. शिवाय प्रत्येक आठवड्यातील सोमवार, मंगळवार, गुरुवार, रविवारी हैदराबाद - नांदेड ही विमानसेवा सुरू होणार आहे. हैदराबाद येथून सकाळी ७:५५ मिनिटाला उडाण घेणारे विमान नांदेड येथे सकाळी ८ :४५ मिनिटांनी पोहचेल, तर परतीच्या प्रवासात नांदेड येथून दुपारी चार वाजून ३० मिनिटाला उड्डाण घेणारे विमान हैदराबाद येथे सायंकाळी पाच वाजून वीस मिनिटाला पोहोचेल, अशी माहिती देण्यात आली आहे.

Mumbai : 'मेलोडी रोड'वर निर्बंध; रहिवाशांच्या तक्रारीनंतर BMCचा निर्णय, आठवड्यातील ३ दिवस 'जय हो' बंद

दोन महिन्यांचीच इंधनशिदोरी! केंद्र सरकारचे अखेर इंधन स्थितीबाबत स्पष्टीकरण

बेस्ट बसेसना टोलमाफी द्या! बेस्ट समिती अध्यक्षांचे उपमुख्यमंत्र्यांना पत्र; पाच वर्षांत ७० कोटींचा टोल भरला

पुण्यात रंगणार 'राडा २०२६'; महाराष्ट्राचा पहिला मराठी पॉप कल्चर फेस्टिव्हल, तरुणांसाठी मोठं व्यासपीठ

कर्करोग रुग्णांसाठी अद्ययावत स्वतंत्र इमारत; १२ ऑपरेशन थिएटर, ३ हजारपेक्षा अधिक बेड्स, फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन