प्रातिनिधिक छायाचित्र
महाराष्ट्र

नांदेड ते गोवा, मुंबई, चंदीगड, अमृतसर विमानसेवेला प्रारंभ होणार; ९१ कंपन्यांकडून नांदेड विमानतळाची पाहणी; बेबी केअर रूमचे उद्घाटन

नांदेड विमानतळाचा वर्षभरात कायापालट करण्यात आला असून, सोयीसुविधा वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच नांदेड हे बंगळुरू, हैदराबाद, पुणे, अहमदाबाद, हिंडन, आदमपूर, भूज या शहरांशी विमानसेवेमुळे जोडले गेले आहे. प्रवाशांचा प्रतिसादही चांगला मिळत आहे. त्यामुळे नुकताच इंडिगो, एअर इंडिया, फ्लाई ९१ कंपनीकडून नांदेड विमानतळाची पाहणी करण्यात आली आहे.

Swapnil S

भास्कर जामकर/नांदेड

नांदेड विमानतळाचा वर्षभरात कायापालट करण्यात आला असून, सोयीसुविधा वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच नांदेड हे बंगळुरू, हैदराबाद, पुणे, अहमदाबाद, हिंडन, आदमपूर, भूज या शहरांशी विमानसेवेमुळे जोडले गेले आहे. प्रवाशांचा प्रतिसादही चांगला मिळत आहे. त्यामुळे नुकताच इंडिगो, एअर इंडिया, फ्लाई ९१ कंपनीकडून नांदेड विमानतळाची पाहणी करण्यात आली आहे. ते गोवा, मुंबई, चंदीगड, अमृतसर यासह अन्य नवीन ठिकाणी विमानसेवा सुरू करण्यास सकारात्मक आहेत, असे आरएडीएचे सीईओ स्नेहशिष दत्ता यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

दरम्यान, एसजीजीएसजे नांदेड विमानतळावर प्रीपेड टॅक्सी सेवा व बेबी केअर रूमचे लंगर साहिब गुरुद्वाराचे श्री बाबा बलविंदरसिंघ यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर सीईओ दत्त यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता जावेद लुत्फुल्ला, नांदेड एसजीजीएसजे विमानतळाचे संचालक राजेश पोडुवाल, आरएडीएलचे रणजित हलदर यांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना सीईओ दत्त म्हणाले, नांदेड विमानतळाने ३१ मार्च रोजी उडान योजनेंतर्गत स्टार एअरच्या विमानसेवेच्या माध्यमातून नांदेड हे बंगळुरू, हैदराबाद, पुणे, अहमदाबाद, हिंडन, आदमपूर, भूज यांना जोडण्यात येणार आहे. त्यामुळे नांदेडचे महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

लवकरच नागपूर, तिरूपती सेवा

३१ मार्च ते २८ फेब्रुवारीपर्यंत नांदेडहून विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या १ लाख १५ हजार ७३ आहे. या कालावधीत नांदेडहून नांदेडपर्यंत चालवण्यात आलेली एकूण उड्डाणे २ हजार ३७२ आहेत. नांदेड विमानतळ उत्तम सेवा आणि प्रवाशांची सोय सुनिश्चित करण्यासाठी नांदेड येथून नवीन क्षेत्र सुरू करण्यासाठी सर्व भारतीय वाहकांशी सतत समन्वय साधत आहे. तसेच नागपूर, तिरूपतीच्या प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे. ही सेवा लवकर सुरू होईल, असे सीईओ स्नेहशिष दत्ता म्हणाले.

मुंबई येथे विमानतळ उतरण्यासाठी व उड्डाण करण्यासाठी स्लॉट (वेळ) मिळत नाही. त्यामुळे नांदेड-मुंबई विमानसेवा सुरू करताना अडथळा निर्माण आहे. नाईट लँडिंगला मान्यता दिली जाते; परंतु, प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नाही. यातूनही मार्ग निघेल.

- स्नेहशिष दत्ता, सीईओ आरएडीए

नेपाळ सरकारने सोशल मिडियावरील बंदी हटवली; युवकांच्या आंदोलनाला यश

Stoinis-Sarah Engagement Photos: स्पेनच्या समुद्रकिनारी स्टॉयनिसचा साखरपुडा; फिल्मी स्टाईलमध्ये केलं प्रपोज

Nashik : आश्रमशाळेतील तिसरीच्या विद्यार्थ्याचा उपचाराअभावी मृत्यू; मृतदेह मुख्याध्यापकांच्या टेबलवर आणून निषेध

आशियातील वर्चस्वासाठी आजपासून चुरस! Asia Cup 2025 स्पर्धेत भारतापुढे जेतेपद राखण्याचे आव्हान, बघा सर्व सामन्यांचं वेळापत्रक

मिठी मारणे हा ‘तिच्या’ शालिनतेला धक्काच; आरोपीला न्यायालयाने ठोठावली एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा