महाराष्ट्र

विनायक राऊत यांच्या याचिकेविरुद्ध नारायण राणेंची कोर्टात धाव

भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी दाखल केलेल्या याचिकेविरोधात हस्तक्षेप अर्ज दाखल केला आहे.

Swapnil S

रत्नागिरी : भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी दाखल केलेल्या याचिकेविरोधात हस्तक्षेप अर्ज दाखल केला आहे. नारायण राणे यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक जिंकण्यासाठी भ्रष्ट आणि बेकायदेशीर पद्धतींचा अवलंब केल्याचा आरोप विनायक राऊत यांनी करत उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यानंतर आता खासदार नारायण राणे यांनी हस्तक्षेप अर्ज दाखल केला आहे.

अधिवक्ते सतीश मानेशिंदे यांच्यामार्फत दाखल केलेल्या हस्तक्षेप अर्जात विनायक राऊत यांची याचिका फेटाळण्याची मागणी करण्यात आली आहे. विनायक राऊत यांच्या याचिकेत तथ्ये आणि तपशील नसल्याचे नारायण राणे यांनी म्हटले आहे. राऊत यांनी वकील असीम सरोदे यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेत नारायण राणे यांनी फसवणुकीने निवडणूक जिंकल्याचा आरोप केला होता. राऊत यांच्यामार्फत दाखल याचिकेत दोष असल्याचा आरोप करत पैसे वाटप करणाऱ्या व्यक्तींच्या नावांसंदर्भात कोणत्याही तपशिलांचा उल्लेख नसल्याचे राणे यांच्या हस्तक्षेप अर्जात म्हटले आहे. निवडणूक याचिकेत आरोपांची संपूर्ण माहिती देणे आवश्यक असते.

विरार-अलिबाग अंतर दोन तासांत पार होणार; मल्टिमॉडेल मार्गिकेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

मराठा आंदोलनाचा विजय! अखेर मनोज जरांगे-पाटलांनी पाचव्या दिवशी उपोषण सोडले; राज्य सरकारकडून ८ पैकी ६ मागण्या मान्य

घटनेतील तरतुदींचे स्पष्टीकरण करणार, सर्वोच्च न्यायालयाची माहिती; राष्ट्रपती, राज्यपालांवर विधेयकावर कालावधीचे बंधन

चीनकडून भव्य लष्करी संचलनात अत्याधुनिक शस्त्रांचे आज प्रदर्शन

GST परिषदेची आज बैठक; दैनंदिन वापरातील वस्तूंवरील कर कमी होण्याची शक्यता