महाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी सभास्थळी पोहोचले, शिवाजी पार्कात काय बोलणार मोदी?

Suraj Sakunde

मुंबई: महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, कल्याणसह एकूण १३ जागांसाठी पाचव्या टप्प्यात मतदान २० मे होणार आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा मुंमुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क येथे होत आहे. या सभेसाठी नरेंद्र मोदी नुकतेच शिवाजी पार्कातील सभास्थळी पोहोचले असून ते नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण राजकीय विश्वाचं लागून राहिलं आहे.

नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर-

आज मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर महायुतीची सभा पार पडणार आहे. राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची पहिली संयुक्त सभा मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क मैदानात होणार आहे. याशिवाय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विनोद तावडे, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह महायुतीचे दिग्गज उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पंतप्रधान मोदींची चैत्यभूमीला भेट-

दरम्यान या सभेला जाण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चैत्यभूमीला जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. तिथून ते सभास्थळी रवाना झाले.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त