महाराष्ट्र

Nashik : मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबाचा पर्दाफाश; अघोरी शक्ती असल्याची भीती दाखवत स्वत:च चढणार होता बोहल्यावर

मुलीच्या अंगात अघोरी शक्ती असल्याने तिचा विवाह अघोरी शक्ती असलेल्या व्यक्तीसोबत अर्थात आपल्यासोबत लावून देण्यासाठी दबाव टाकणाऱ्या आणि मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू बाबा विरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Swapnil S

नाशिक : मुलीच्या अंगात अघोरी शक्ती असल्याने तिचा विवाह अघोरी शक्ती असलेल्या व्यक्तीसोबत अर्थात आपल्यासोबत लावून देण्यासाठी दबाव टाकणाऱ्या आणि मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू बाबा विरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी अंधश्रद्धा निर्मुलन समिती आणि महिला तक्रार निवारण केंद्र यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेत कारवीची मागणी केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, नाशिकच्या सातपूर कॉलनी भागात सिद्धार्थ भाटे उर्फ सिद्धार्थ गुरु याचा दरबार भरतो. त्यामध्ये अनेक नागरिक येवून समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करतात. नाशिक रोड येथे वास्तव्यास असलेली तरुणी आपल्या आईसोबत भाटे याच्या दरबारात आली. आपल्या आयुष्यातील वैयक्तिक अडचणी सोडवण्यासाठी बाबा काहीतरी उपाय सांगतील या भाबड्या आशेपोटी ही तरुणी येथे आल्याचे सांगण्यात आले. मात्र, तिच्या असहायतेचा फायदा घेत बाबाने मुलीच्या अंगात अघोरी शक्ती असल्याने तिचा विवाह होणे कठीण असल्याचे सांगत आपल्यात अघोरी शक्ती असल्याने तिची गाठ आपल्यासोबत बांधण्याची सूचना तिच्या आईला केली. बाबाच्या बोलण्याने भूललेल्या महिलेने मुलीचा साखरपुडा त्याच्यासोबत करताना वेगळे राहणाऱ्या पतीलाही त्याची कल्पना दिली नाही. या काळात बाबाने मुलीचे लैंगिक शोषण केले. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात महिलेला तिच्या माहेरकडील लोकांनी साथ दिली.

आणि बिंग फुटले..

दरम्यान, मुलीचे लग्न करायचे असल्याने पतीकडे महिलेने एक लाख रुपये मागितले. तेव्हा तिचा पती कोण अशी चौकशी केल्यानंतर तो भोंदूगिरी करणारा बाबा असल्याचे उघड झाले. पुढील धोका ओळखून मुलीच्या वडिलांनी अंधश्रद्धा निर्मुलन समितीसोबत संपर्क साधून सविस्तर माहिती दिली. समितीचे डॉ. गोराणे तसेच महिला तक्रार निवारण केंद्र पदाधिकारी यांनी संयुक्तपणे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेत बाबावर कारवीची मागणी केली. त्यानंतर नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. डॉ. गोराणे यांच्या माहितीनुसार, ओझर येथील आणखी एक महिलाही बाबाच्या जाळ्यात अडकली आहे.

कल्याणमध्येही भरतो दरबार..

सातपूर कॉलनी भागात सिद्धार्थ भाटे उर्फ सिद्धार्थ गुरु याचा नियमित दरबार भरतो. त्यासाठी तो समाज माध्यमांवर जाहिराती करून अडचणीत असलेल्या लोकांना आकर्षित करतो. सातपूर सोबतच कल्याण येथेही बाबाचा दरबार भरत असल्याची माहिती पुढे आली आहे. समाज माध्यमांवर जाहिरातीमुलेच नाशिक रोड येथील महिला आणि तिची मुलगी बाबाच्या संपर्कात आली.

भारताला २०३०च्या राष्ट्रकुलचे यजमानपद; अहमदाबादची आयोजनासाठी निवड; लवकरच अधिकृत घोषणा

धक्कादायक! रशियात नोकरीचं आमिष दाखवून युक्रेनसोबतच्या युद्धात लढायला पाठवलं; "माझ्या पतीला भारतात परत आणा" - पत्नीची याचना

जिंकलंस भावा! कर्जतच्या तरुणाने मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर केली महिलेची प्रसूती; डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करून वाचवले दोन जीव

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ट्रॅफिकचा कहर! तब्बल १२ तास अडकले हजारो लोकं, २० पेक्षा जास्त शाळांच्या पिकनिक रद्द

अल्पसंख्याक शाळांमध्ये क्रीडा शिक्षक बंधनकारक! शाळांची मान्यता रद्द करण्याचा क्रीडामंत्री कोकाटे यांचा इशारा