महाराष्ट्र

धक्कादायक! नाशिकमध्ये पोलीस अधिकाऱ्याने ठाण्यातच स्वतःला संपवले, डोक्यात गोळी झाडून केली आत्महत्या

आपल्या कॅबिनमधील खुर्चीवर बसलेले असतानाच त्यांनी स्वतःला गोळी मारून घेतली.

Swapnil S

नाशिकमधून धक्कादायक बातमी आली आहे. येथील अंबड पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी अशोक नजन (वय ४०) यांनी मंगळवारी सकाळी अंबड पोलिस ठाण्यातच स्वतःच्या कॅबीनमध्ये सर्विस रिव्हॉल्वरने डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली. सकाळी १० वाजेच्या सुमारास पोलिस निरीक्षक नजन यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते.

नजन हे सकाळी घरून पोलिस ठाण्यात आले होते. आपल्या कॅबिनमधील खुर्चीवर बसलेले असतानाच त्यांनी स्वतःला गोळी मारून घेतली. प्राथमिक माहितीनुसार, सर्व कर्मचारी हजर झाल्यानंतर हजेरी घेण्यात येत होती. त्याचवेळी पिस्तूलचा आवाज आला. कर्मचाऱ्यांनी नजन यांच्या केबिनमध्ये धाव घेतली असता अशोक नजन रक्ताच्या थारोळ्यात खुर्चीवर पडलेले दिसून आले.

तथापि, त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी धाव घेतली आहे. या प्रकरणी पोलिस तपास सुरू करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. 

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक

घरांच्या किमती वाढल्याची राज्य सरकारची कबुली