महाराष्ट्र

नाशिकमध्ये भरधाव गाडी बंगल्यात घुसून एकाच कुटुंबातील ५ ठार

नाशिक जिल्ह्यात रस्त्याच्या कडेला असलेल्या एका घरात भरधाव वेगाने जाणारी गाडी घुसून झालेल्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील पाच जण ठार झाले, तर अन्य एक गंभीर जखमी झाल्याचे पोलिसांनी गुरुवारी सांगितले.

Swapnil S

नाशिक : नाशिक जिल्ह्यात रस्त्याच्या कडेला असलेल्या एका घरात भरधाव वेगाने जाणारी गाडी घुसून झालेल्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील पाच जण ठार झाले, तर अन्य एक गंभीर जखमी झाल्याचे पोलिसांनी गुरुवारी सांगितले.

कळवण तालुक्यातील कोल्हापूर फाटा येथे बुधवारी रात्री हा अपघात झाला. मृतांमध्ये दोन अल्पवयीन आहेत. सटाणा येथील नामपूरमधील एक कुटुंब विवाह समारंभ आटोपून घरी परतत असताना गाडीचालकाचे वाहनावरील ताबा सुटला आणि गाडी नाशिक-कळवण मार्गावरील एका बंगल्यावर आदळली.

या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य एका गंभीर जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शैला भदान (६२), माधवी मेटकर (३२), त्रिवेणी मेटकर (४), सरला भदान (५०) आणि चालक खलिक पठाण (५०) यांचा जागीच मृत्यू झाला, तर एका १२ वर्षांच्या मुलाचा रुग्णालयात मृत्यू झाला.

आजची मतमोजणी रद्द! नगरपरिषद, नगरपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल आता २१ डिसेंबरला

Drumstick Pickle : डायबिटीसवाल्यांसाठी बेस्ट! शेवग्याच्या शेंगांचं चटकदार लोणचं; १५ मिनिटांत रेडी...

PCOS ने त्रस्त आहात? 'या' योगासनांनी मिळेल नैसर्गिक आराम

झोपडपट्टी मुक्तीसाठी समूह पुनर्विकासाचा पर्याय

महायुतीच्या गोंधळात निवडणूक आयोगाची भर!