महाराष्ट्र

नाशिकच्या तपोवन परिसरातील वृक्षतोडीवर मनसे आक्रमक, अमेय खोपकर म्हणाले, 'एकाही झाडाला...

तब्बल १८०० झाडांची कत्तल केली जाणार असल्याने पर्यावरणप्रेमींनी यावर आक्षेप घेतला आहे. याच पाश्वभूमीवर आज (दि. ०६) महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेकडून निषेध करण्यात आला.

किशोरी घायवट-उबाळे

नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यात साधू-महंतांना राहण्यासाठी तपोवन परिसरात ११५० एकरांवर साधुग्राम उभारणार आहेत. यासाठी तब्बल १८०० झाडांची कत्तल केली जाणार असल्याने पर्यावरणप्रेमींनी यावर आक्षेप घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर आज (दि. ०६) महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेकडून निषेध करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी 'एकाही झाडाच्या फांदीला मनसे हात लावू देणार नाही' असा इशारा दिला. याशिवाय, "जसं पार्थ पवारला माफ केलं तसं झाडांना माफ करा", असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २९ नोव्हेंबरला सोशल मीडियाच्या माध्यमातून आगामी कुंभमेळ्यासाठी सरकारने घेतलेल्या भूमिकेवर संताप व्यक्त केला होता. त्यानंतर आज मनसे नेते अमेय खोपकर यांनी वृक्षतोडीवर आवाज उठवला.

पार्थ पवारला माफ केलंत, तसं झाडांना माफ करा

अमेय खोपकर म्हणाले, "मला लाज वाटतेय की, या सरकारने झाडांवर फुल्या मारल्या. हे तर आई-वडिलांवर फुल्या मारल्यासारखे आहे. एकही झाडाच्या फांदीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना हात लावू देणार नाही. माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की, जसं तुम्ही पार्थ पवारला माफ केलंत, तसं झाडांना माफ करा. झाडे तोडण्याचा प्रयत्न झाला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन करेल."

आम्ही साधू-महंताचे स्वागत करतो पण...

नाशिक येथील तपोवनात होणाऱ्या वृक्षतोडीवर मनसे आंदोलनकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत 'गिरीश महाजन होश में आओ' अशा घोषणा दिल्या. ते पुढे म्हणाले, "आम्ही साधू-महंताचे स्वागत करतो पण उरावर बसून आम्ही कुंभमेळा होऊ देणार नाही. हा परिसर बिल्डरच्या घशात घालायचा प्लॅन सुरु आहे. आम्हाला यात काही राजकीय पोळी भाजायची नाही. जिथे पंधरा हजार झाडे लावणार आहेत. तिथे कुंभमेळा भरवा. गिरीश महाजन खोटे बोलत आहेत. ते कुठेही गेले नाहीत." असे म्हणत अमेय खोपकर यांनी वृक्षतोडीवर आक्रमक भूमिका घेतली.

आमचा या वृक्षतोडीला विरोधच...

"नाशिककरांचा या वृक्षतोडीला तीव्र विरोध आहे. नाशिकरांना माझं आवाहन आहे की, तुम्ही ठाम रहा, तुमच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी राहील. यामध्ये खरतर कोणतेच राजकारण नाही, या आत्ता होणाऱ्या निवडणुकांनंतर देखील आमचा या वृक्षतोडीला विरोधच राहील!" असे म्हणत राज ठाकरेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली होती. त्यानंतर आज अमेय खोपकर यांनी आंदोलनाचा इशारा दिला. वृक्षतोडीवरआता कोणते ठोस पाऊल उचलले जाते, यावर पर्यावरणप्रेमींचे लक्ष लागले आहे.

IndiGoची मोठी घोषणा; प्रवाशांचे पैसे परत मिळणार, री-शेड्युलिंग शुल्क शून्य

नाशिकच्या १८०० झाडांवर कुऱ्हाड? मनसेनंतर आदित्य ठाकरेंची एंट्री; भाजप-बिल्डर लॉबीवर घणाघात, "भाजपच्या बिल्डर मित्रांची...

Thane : भिवंडीत डॉ. बाबासाहेबांच्या श्रद्धांजली बॅनरचा अपमान; दोघांविरोधात गुन्हा दाखल

महापरिनिर्वाण दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आंबेडकरांना अभिवादन; "त्यांच्या दूरदृष्टीमुळे भारत...

"स्टाफला दोष देऊ नका"; IndiGo फ्लाइट रद्दप्रकरणी सोनू सूदचे नागरिकांना शांततेचे आवाहन