महाराष्ट्र

Nashik : सोनसाखळी चोराला २ महिलांनी घडवली चांगलीच अद्दल; आधी धु धु धुतलं, मग...|Video

रस्त्यावर चालताना एखादा चैन चोर येतो, चैन ओढतो आणि बाईकवर बसून पळून जातो. या घटना महिलांसोबत वारंवार घडतात. महिलांच्या गळ्यात मंगळसूत्र अथवा चैन घेऊन चोर पसार होण्याच्या घटना या आधी आपण पाहिल्या आहेत.

नेहा जाधव - तांबे

रस्त्यावर चालताना एखादा चैन चोर येतो, चैन ओढतो आणि बाईकवर बसून पळून जातो. या घटना महिलांसोबत वारंवार घडतात. महिलांच्या गळ्यात मंगळसूत्र अथवा चैन घेऊन चोर पसार होण्याच्या घटना या आधी आपण पाहिल्या आहेत. पण, नाशिकमध्ये अशाच एका सोनसाखळी चोराला दोन महिलांनी चांगलाच इंगा दाखवला आहे. या महिलांनी त्या चोराला पळून जाण्याची संधीही दिली नाही. या महिलांचे धाडस सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून सोशल मीडियावर त्यांचे कौतुक होत आहे.

ही घटना नाशिकमधील जय भवानी रोडवर घडली. व्हिडिओमध्ये दिसतंय, की दोन महिला घराबाहेर गेटवर उभ्या आहेत. त्यांच्या पाठी एक तरुण येतो आणि एका महिलेच्या गळ्यातील चैन खेचून बाईकवर बसून पळून जाण्याचा प्रयत्न करतोय. तितक्यात त्या दोन्ही महिला त्याच्या पाठून धावतात आणि त्याला बेदम मारतात.

पाहा व्हिडिओ -

ज्या महिलेची चैन आहे, ती त्याला मारताना दिसतेय. तर, दुसरी महिला त्याची कॉलर पकडून त्याला बाईकवरून खाली ओढतेय. चोर बाईकवरून खाली पडतो, आणि पळून जाण्याचा प्रयत्न करत असतानाच शेजारील घरातून एक पुरुष धावत येतो आणि त्या चोराचा पाठलाग करताना दिसतोय.

या घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. सध्या हा व्हीडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. तर, महिलांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 'आज तक'ने दिलेल्या वृत्तानुसार, या चोराला पोलिसांनी अटक केले आहे.

Maratha Reservation : मराठा वादळाने मुंबईला हादरा; आता माघार नाही – मनोज जरांगेंचा निर्धार; पावसामुळे आंदोलकांचे प्रचंड हाल

मुंबईला पावसाने झोडपले; पुढील तीन दिवस मध्यम पावसाची शक्यता

महायुतीच्या घोडचुकीमुळे मुंबईकर वेठीस; मराठा आंदोलनामुळे मुंबईत गोंधळाची स्थिती

आंदोलनामुळे हॉटेल, दुकाने बंद; आंदोलकांची झाली गैरसोय, सोबत १५ दिवसांची शिदोरी...

CSMT टाळण्याचे प्रवाशांना रेल्वेचे आवाहन; मराठा आरक्षण आंदोलनामुळे दक्षिण मुंबई ठप्प