नसरापूर प्रकरण : आरोपीला १२ मेपर्यंत कोठडी 
महाराष्ट्र

नसरापूर चिमुकली अत्याचार प्रकरणाचा २५ जूनला अंतिम निकाल

महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथील तीन वर्षीय चिमुकलीच्या लैंगिक अत्याचार आणि खून प्रकरणाचा अंतिम निकाल येत्या २५ जून रोजी लागणार आहे.

Swapnil S

पुणे : महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथील तीन वर्षीय चिमुकलीच्या लैंगिक अत्याचार आणि खून प्रकरणाचा अंतिम निकाल येत्या २५ जून रोजी लागणार आहे.

या खटल्याच्या सुनावणीदरम्यान आरोपी भीमराव कांबळे याने विशेष न्यायाधीश एस.आर.साळुंखे यांच्यासमोर आपल्या गुन्ह्याची कबुली दिली असून, दोन्ही बाजूंचा अंतिम युक्तिवाद शनिवारी पूर्ण झाला आहे. हा खटला राज्यातील सर्वात जलदगतीने चालविलेला खटला ठरण्याची दाट शक्यता असून, अवघ्या महिनाभरात या प्रकरणाचा निकाल जाहीर होणार आहे.

विशेष न्यायालयात झालेल्या सुनावणीत आरोपी भीमराव कांबळे याला कडक पोलीस बंदोबस्तात हजर करण्यात आले होते. न्यायालयाच्या सोप्या भाषेतील प्रश्नांनंतर आणि सीसीटीव्ही चित्रीकरण झूम करून दाखवल्यानंतर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. शनिवारी झालेल्या अंतिम युक्तिवादात विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी आरोपीच्या क्रूरतेवर प्रकाश टाकला. तांत्रिक पुराव्यांनुसार, सरकारी पक्षाने न्यायालयात दावा केला की, पीडितेच्या मृत्यूनंतरही आरोपीने तिच्या मृतदेहावर अत्याचार केले.

विधिमंडळाचे उद्यापासून पावसाळी अधिवेशन; ऑपरेशन टायगर, पाणीटंचाई, शेतकरी कर्जमाफी, विषारी दारूकांडाचे मुद्दे गाजणार

Mumbai : उच्च रक्तदाब ठरतोय आरोग्याचा मोठा धोका; फादर्स डे निमित्ताने डॉक्टरांनी व्यक्त केली चिंता

गॅस दरवाढीचा फटका तेल कंपन्यांनी सोसला; विविध देशातून भारताने मागवला LPG

१०१६ मेट्रिक टन आंब्याची विक्रमी निर्यात; लासलगाव येथून तीन देशांमध्ये हापूस आणि केशर आंबा रवाना

Mumbai : कंत्राटदारांना ५५ कोटींचा दंड, वसुली मात्र २३ कोटींची; रस्ते कामात निकृष्ट दर्जा, दिरंगाईबद्दल केला होता दंड