गणेश नाईकांविरुद्ध शिंदे गट आक्रमक; वने राहिली नाहीत तर वनमंत्री काय कामाचे - नीलेश राणे  
महाराष्ट्र

गणेश नाईकांविरुद्ध शिंदे गट आक्रमक; वने राहिली नाहीत तर वनमंत्री काय कामाचे - नीलेश राणे

नवी मुंबई महापालिका निवडणुकीपासून भाजपचे नेते आणि वन मंत्री गणेश नाईक आणि शिवेसना शिंदे गटात सुरू असलेल्या संघर्षाला धार चढली असून आता शिंदे गटानेही नाईक यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत.

Swapnil S

मुंबई : नवी मुंबई महापालिका निवडणुकीपासून भाजपचे नेते आणि वन मंत्री गणेश नाईक आणि शिवेसना शिंदे गटात सुरू असलेल्या संघर्षाला धार चढली असून आता शिंदे गटानेही नाईक यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के यांच्या पाठोपाठ शिवसेना शिंदे गटाचे आमदार नीलेश राणे यांनी नाईक यांच्यावर शरसंधान सोडले आहे. ‘वनेच राहिली नाहीत, तर वनमंत्री काय कामाचे?’, असा सवाल राणे यांनी सोमवारी ‘एक्स’ या समाज माध्यमातून केला.

गणेश नाईक यांनी गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. नवी मुंबईकरांच्या सुविधेसाठी जे भूखंड मागितले होते ते बिल्डरांच्या घशात घातले जात आहेत. नगरविकास खात्यातील लोकांनी हे कर्मदरिद्री काम केले. रुग्णालय, बाग, शाळेसाठी जे भूखंड मागितले ते भूखंड बिल्डर लोकांच्या घशात यांच्या दलालांनी घातले. मला या गोष्टीची लाज वाटते की, ज्या मंत्रिमंडळात मी आहे, त्या मंत्रिमंडळातील नगरविकास खात्याच्या लोकांनी अशा प्रकारचा कर्मदरिद्रीपणा केला, असा आरोप नाईक यांनी शिंदे यांचे नाव न घेता केला. नाईक यांच्या या आरोपांना डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उत्तर दिले होते.

सोमवारी नीलेश राणे यांनी नाईक यांच्यावर हल्ला चढवला. मंत्री गणेश नाईक हे वनमंत्री आहेत. मोठ्या प्रमाणात जंगलतोड सुरू आहे. ज्यामुळे जनावरांचा त्रास होतो, कोकणातल्या शेतकऱ्यांनी शेती जवळपास या जनावरांच्या त्रासामुळे सोडलेली आहे. अनेक ठिकाणी फॉरेस्ट ऑफिसर नाही, फॉरेस्ट इन्फ्रास्ट्रक्चरला पैसे नाहीत. साधनसामुग्री नाही, उपवनसंरक्षक दुसऱ्या राज्यातले असल्यामुळे त्यांचा उपयोग ग्रामीण भागाला होत नाही.

लाकूडतोडी एवढ्या मोठ्या प्रमाणात चालते की ती वनमंत्र्यांच्या परवानगीने चालली आहे का, असा प्रश्न पडायला लागलाय. जसे नवी मुंबईचे डोंगर पोखरले तसे आता जंगल पोखरले जात आहे. अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्यांना वन विभाग परवानगी देत नाही. ज्यामुळे ग्रामीण भाग विकासाच्या योजनांपासून वंचित राहतो. वरील सगळे विषय गंभीर आहेत, पण सध्या वनमंत्री स्वतःला टीआरपी मिळवण्यासाठी व्यस्त दिसत आहेत, अशी टीका नीलेश राणे यांनी केली आहे.

LPG टँकर 'ग्रीन सान्वी' मुंबईकडे मार्गस्थ; होर्मुझ सामुद्रधुनी पार करणारे सातवे भारतीय जहाज

Navi Mumbai : 'डिजिटल अरेस्ट'चा सापळा! पनवेलमधील ज्येष्ठ नागरिकाला ८ दिवसांत १.५४ कोटींचा गंडा

Nashik : दिंडोरीत विहिरीत कार कोसळून ९ जणांचा मृत्यू; राज्य सरकारतर्फे मृतांच्या वारसांना ५ लाखांची आर्थिक मदत जाहीर

Chandrapur : मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून प्रेयसीची हत्या अन् केला आत्महत्येचा बनाव; आरोपी प्रियकर अटकेत

Mumbai : 'पिंक टॉयलेट'मध्येच कॅफे! फॅशन स्ट्रीटजवळील प्रकार उघड; स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह, Video