नवी मुंबईतील दोन तरुण अलिबाग समुद्रात बेपत्ता; चार मित्रांपैकी दोघे पाण्यात बुडाले; शोधकार्य सुरू 
महाराष्ट्र

नवी मुंबईतील दोन तरुण अलिबाग समुद्रात बेपत्ता; चार मित्रांपैकी दोघे पाण्यात बुडाले; शोधकार्य सुरू

नवी मुंबई येथून पर्यटनासाठी आलेल्या चार मित्रांपैकी दोन तरुण अलिबाग समुद्रात बेपत्ता झाल्याची घटना १ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी घडली. शनिवारपासून शोधमोहीम सुरू असताना देखील दोघांचा शोध लागलेला नाही. बेपत्ता तरुणांची नावे शशांक सिंग (१९) आणि पलाश पखर (१९) अशी आहेत.

Swapnil S

अलिबाग : नवी मुंबई येथून पर्यटनासाठी आलेल्या चार मित्रांपैकी दोन तरुण अलिबाग समुद्रात बेपत्ता झाल्याची घटना १ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी घडली. शनिवारपासून शोधमोहीम सुरू असताना देखील दोघांचा शोध लागलेला नाही. बेपत्ता तरुणांची नावे शशांक सिंग (१९) आणि पलाश पखर (१९) अशी आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, चार मित्र सायंकाळी साडेसहा वाजता अलिबाग समुद्रकिनारी फेरफटका मारण्यासाठी गेले होते. त्यापैकी एक मित्र लांब खडकावर गेला असता त्याचा तोल जाऊन तो पाण्यात पडला. मदतीसाठी त्याने मित्रांना हाक मारली. हे पाहून दुसऱ्या मित्राने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला; मात्र दोघेही पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले.

तिसऱ्या मित्राने दोघांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण यश आले नाही. त्यानंतर त्यांनी आरडाओरड करून जवळच क्रिकेट खेळणाऱ्या स्थानिक तरुणांना घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच अलिबाग पोलीस निरीक्षक किशोर साळे आणि तहसीलदार विक्रम पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने बोट, जेट-स्की आणि ड्रोनच्या सहाय्याने शोध मोहीम राबवण्यात आली.

मूळ मालकाला भरपाई दिल्याशिवाय प्रकल्पाग्रस्तांना जमिनीचे वाटप अयोग्य; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

प्रल्हाद जोशी नवे केंद्रीय शिक्षणमंत्री; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर स्वीकारला पदभार

Mumbai : शिवाजी पार्कवर तरुणाईचा महासागर! ठाकरे बंधूंच्या विजय जल्लोष सभेला हजारोंची उपस्थिती; VIDEO

'ही केवळ सुरुवात, अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे'; अभिजीत दिपकेंचा नवा व्हिडीओ चर्चेत

युनेस्कोकडून सारनाथला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा; भारताच्या सांस्कृतिक वैभवात मानाचा तुरा, जाणून घ्या इतिहास अन् वैशिष्ट्ये