नीट पेपरफुटी प्रकरण : पाच निवृत्त प्राध्यापक सीबीआयच्या रडारवर 
महाराष्ट्र

नीट पेपरफुटी प्रकरण : पाच निवृत्त प्राध्यापक सीबीआयच्या रडारवर

नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता पुण्यापर्यंत पोहोचले असून, मुख्य आरोपी तेजस शाह याचे पुण्यातील काही नामांकित महाविद्यालयांतील प्राध्यापकांशी संबंध असल्याची माहिती सीबीआय तपासात समोर आली आहे. या प्रकरणात एका प्रतिष्ठित महाविद्यालयातील पाच निवृत्त प्राध्यापक सीबीआयच्या रडारवर आहेत.

Swapnil S

पुणे : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता पुण्याच्या शैक्षणिक वर्तुळापर्यंत पोहोचले आहेत. या प्रकरणातील अटकेत असलेला मुख्य आरोपी तेजस शाह याचे पुण्यातील अनेक नामांकित महाविद्यालयांतील प्राध्यापकांशी गेल्या अनेक वर्षांपासून जवळचे संबंध असल्याचे वास्तव सीबीआयच्या तपासात समोर आले आहे. या माहितीनंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आपला तपासाचा फास आवळला असून, पुण्यातील एका प्रतिष्ठित महाविद्यालयातील पाच निवृत्त प्राध्यापक सध्या सीबीआयच्या रडारवर आहेत.

तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, तेजस शाह हा केवळ प्राध्यापकांच्या संपर्कातच नव्हता, तर त्याने या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका आणि उत्तरे पुरवल्याची कबुलीवजा माहिती चौकशीत समोर आली आहे. शाह याचे शहरातील अनेक नामवंत कॉलेजच्या प्राध्यापकांशी दीर्घकाळापासून नीट पेपर संदर्भात लागेबांधे होते. विशेष म्हणजे, यामध्ये केवळ निवृत्त प्राध्यापकच नव्हे, तर पुण्यातील अनेक खासगी महाविद्यालयांतील विद्यमान प्राध्यापकांचाही समावेश असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. तेजस शाहने पेपर फुटीच्या अनुषंगाने या प्राध्यापकांशी वारंवार संपर्क साधला होता, असेही तपासात निष्पन्न झाले आहे.

Mumbai : उद्या मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेवर मध्यरात्री जम्बो ब्लॉक, कोणत्या लोकल रद्द? जाणून घ्या

Mumbai CJP Protest : अभिनेता इम्रान खान पोलिसांच्या ताब्यात; व्हॅनमधून फोटो शेअर करत म्हणाला...

CJP Protest : आंदोलनाला हिंसक वळण; अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जींसह अनेक नेते पोलिसांच्या ताब्यात, Video

CJP Protest : अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; जंतर-मंतरवरील आंदोलनाची धुरा आता अजिंक्य शिंदेंकडे, Video

अभिजीत दिपके यांच्या आजीचं निधन; नातू दिल्लीत पोलिसांच्या ताब्यात, अंत्यसंस्कारासाठी गावी परतण्याची शक्यता