NEET पेपरफुटीचा ९ अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला फटका; अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे प्रवेश होणार वेळेत संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

NEET पेपरफुटीचा ९ अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला फटका; अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे प्रवेश होणार वेळेत

नीट पेपरफुटीचा फटका राज्यातील ९ अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला बसला आहे. नीट फेरपरीक्षेचा निकाल लांबल्यास राज्यातील ९ अभ्यासक्रमांचे प्रवेश जागा रिक्त ठेवून करण्यात येतील तसेच अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे प्रवेश वेळेत होणार असल्याचे सीईटी कक्षातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

Swapnil S

मुंबई: नीट पेपरफुटीचा फटका राज्यातील ९ अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला बसला आहे. नीट फेरपरीक्षेचा निकाल लांबल्यास राज्यातील ९ अभ्यासक्रमांचे प्रवेश जागा रिक्त ठेवून करण्यात येतील तसेच अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे प्रवेश वेळेत होणार असल्याचे सीईटी कक्षातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

नीट परीक्षेचे गुण कृषी अभियांत्रिकी, जैवतंत्रज्ञान, अन्न अभियांत्रिकी, चर्म तंत्रज्ञान, वेष्टन तंत्रज्ञान, औषध अभियांत्रिकी, मुद्रण अभियांत्रिकी, फॅशन तंत्रज्ञान आणि वस्त्र रसायनशास्त्र या ९ अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑल इंडिया कोटा (१५ टक्के) ग्राह्य धरण्यात येतात. हे ९ अभ्यासक्रम १७ शासनमान्य संस्थांमध्ये आहेत.

प्रवेश प्रक्रियेबाबत संभ्रम नको!

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी निर्धारित केलेल्या वेळापत्रकानुसार राज्यातील तांत्रिक व्यावसायिक अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते. या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून जाहीर होणाऱ्या वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रिया आयोजित करण्यात येतील, तर नीट पुनर्परीक्षेचा निकाल लागण्यास विलंब झाल्यास नऊ अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशामध्ये १५ टक्के अखिल भारतीय कोट्यातील जागांचा समावेश न करता त्या जागा वगळून उर्वरित जागांवरील प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येतील, असे सीईटी कक्षाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी व पालकांनी प्रवेश प्रक्रियेबाबतचा संभ्रम बाळगू नये, असे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे.

Mumbai : क्रीडा भवनाच्या जागेवर नवे सभागृह; नव्या पालिका सभागृहासाठी भाजपची चाचपणी सुरू, जागेसाठी सरकारची मंजुरी आवश्यक

एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरण आखणार; सर्वंकष आराखड्यासाठी उच्चस्तरीय समिती गठित

Mumbai : कालिदास स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समधील सक्तीच्या कारवाईला स्थगिती; हायकोर्टाने BMC ला फटकारले

Mumbai : सेवानिवृत्त अधिकारीच मागच्या दाराने सल्लागार म्हणून येतात; स्थायी समितीत गणेश खणकर यांचा आरोप

अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गबार्ड यांनी अचानक पद सोडले