महाराष्ट्र

नाशिक विमानतळावर होणार नवीन धावपट्टी; हिंदुस्तान एरोनॉटिक्सची २०० कोटींची गुंतवणूक

नाशिक विमानतळावर नवीन धावपट्टीस मंजुरी मिळाली आहे. नाशिक विमानतळावरील सध्या अस्तित्वात असलेल्या धावपट्टीला समांतर नवीन धावपट्टी निर्माण करण्याचा निर्णय हिंदुस्तान एरोनॉटिक्सने घेतला असून या धावपट्टीसाठी २०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे.

Swapnil S

लासलगाव : नाशिक विमानतळावर नवीन धावपट्टीस मंजुरी मिळाली आहे. नाशिक विमानतळावरील सध्या अस्तित्वात असलेल्या धावपट्टीला समांतर नवीन धावपट्टी निर्माण करण्याचा निर्णय हिंदुस्तान एरोनॉटिक्सने घेतला असून या धावपट्टीसाठी २०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. नाशिक विमानतळाच्या विकासासाठी गती मिळणार असून नाशिकमध्ये हवाई वाहतुकीसाठी मोठी संधी उपलब्ध होणार आहे.

१६ जुलै २०२४ व २१ जानेवारी २०२५ रोजी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांना पत्र लिहून इंडिया मिडल ईस्ट इकॉनॉमिक कॉरिडॉर अंतर्गत या धावपट्टीला मंजुरी देण्याची मागणी केली होती. या मागणीनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या पडताळणी सुविधेसाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्सला मान्यता दिली आहे. यामुळे नाशिक विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवाही शक्य झाले आहे.

पहिल्याच दिवशी आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा; विरोधी पक्षनेतेपदावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचे निधन; वंचित आणि कष्टकऱ्यांचा आवाज हरपला

‘वंदे मातरम’वर चर्चेची गरजच काय? प्रियांका गांधी यांचा लोकसभेत सवाल

'वंदे मातरम'वरून गोंधळ; काँग्रेसने ‘वंदे मातरम’चे तुकडे केले - मोदी

हिंद दी चादर : धर्म, स्वातंत्र्य आणि मानवतेचे कवच!