महाराष्ट्र

निलेश लंकेंनी करून दाखवलं! थेट इंग्रजीतून घेतली खासदारकीची शपथ; सुजय विखेंचं 'ते' चॅलेंज पूर्ण

Suraj Sakunde

आज दिल्लीतील नव्या संसद भवनात नवनिर्वाचित खासदारांचा शपधविधी पार पडला. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी इंग्रजी भाषेत घेतलेली शपथ चर्चेत आहे. इंग्रजी भाषेत शपथ घेऊन निलेश लंके यांनी एकप्रकारे सुजय विखेंनी दिलेलं चॅलेंज पूर्ण केल्याचं बोललं जात आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत अहमदनगर मतदारसंघात मोठी चुरस पाहायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या निलेश लंके आणि भाजपच्या सुजय विखे यांच्यामध्ये मोठा कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळालं. यादरम्यान निलेश लंकेंवर टीका करताना सुजय विखे यांनी निलेश लंके यांना इंग्रजी बोलता येत नाही, निलेश लंके यांनी माझ्याएवढं इंग्रजी, हिंदी बोलून दाखवावं, असं आव्हान दिलं होतं.

दरम्यान निलेश लंके यांनी सुजय विखेंचा सुमारे २८ हजार मतांनी पराभव केला. त्यानंतर आज दिल्लीतील नव्या संसद भवनात नवनिर्वाचित खासदारांचा शपधविधी सोहळा पार पडला. यादरम्यान निलेश लंकेंनी इंग्रजी भाषेत शपथ घेऊन सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. निलेश लंके यांनी खासदारकीची शपथ घेताच अहमदनगरमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून आणि एकमेंकांना पेढे भरवून आनंद साजरा केला.

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

पोलिसांवर हायकोर्ट संतापले; अतिरिक्त पोलीस आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; तिकीट आरक्षणाच्या नियमात बदल; १ नोव्हेंबरपासून होणार लागू

Maharastra Assembly Elections 2024: पक्षांतर्गत बंडाळीच्या धोक्यामुळे महायुती, मविआकडून सावध पवित्रा

नागरिकत्व कायद्यातील अनुच्छेद '६ए' वैध; सर्वोच्च न्यायालयाचा बहुमताने निर्वाळा