x @BJP4India
महाराष्ट्र

विधानसभेच्या तोंडावर भाजप नेत्यांचे वाढते दौरे, जागावाटपासाठी खलबते सुरू

भाजप नेत्यांच्या वाढलेल्या महाराष्ट्र दौऱ्यांची चर्चा राजकीय वर्तुळातही होऊ लागली असून विधानसभा निवडणुकीत भाजपने आपले सारे लक्ष महाराष्ट्रावर केंद्रित केले असल्याचे बोलले जात आहे.

Swapnil S

मुंबई : भाजपचे वरिष्ठ नेते व केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री सध्या एकापाठोपाठ एक मुंबईचे दौरे करीत आहेत. भाजप नेत्यांच्या वाढलेल्या महाराष्ट्र दौऱ्यांची चर्चा राजकीय वर्तुळातही होऊ लागली असून विधानसभा निवडणुकीत भाजपने आपले सारे लक्ष महाराष्ट्रावर केंद्रित केले असल्याचे बोलले जात आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे सध्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई दौऱ्यावर आहेत. त्याआधी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारीच मुंबईला भेट देऊन मुंबईच्या लोकल ट्रेनमधून प्रवास करीत प्रवाशांशी संवाद साधला होता. गृहमंत्री अमित शहा यांनीही

जागावाटपासाठी खलबते सुरू

मुंबईत येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी गणरायाचे दर्शन घेतले होते. अशी एकामागून एक बड्या नेत्यांची महाराष्ट्राकडे लागलेली रीघ थांबायचे नावच घेत नाहीये. आज केंद्रीय मंत्री रिज्जू यांनी मुबईत पारसी समुदायाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. या सगळ्या घडामोडी पाहता, लोकसभा निवडणुकीत कमी जागा मिळाल्याने यावेळी विधानसभेसाठी भाजपने धोका पत्करायचा नसल्याचे ठरविले आहे.

शनिवारी नड्डा यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी राज्यातील मतदारसंघ व भाजपने राज्यात कोणत्या जागा लढवाव्यात याविषयी चर्चा करण्यात आल्याचे समजते. महायुतीतील तीनही पक्षांच्या कार्यकत्यांमध्ये सध्या सुरू असलेली वादावादी थाबवणे व सर्वांनी एकत्रितपणे काम करण्यावर कसा भर देता येईल, हा सर्वांत महत्त्वाचा मुद्दा भाजपसमोर आहे.

काढ रे तो पडदा! राज ठाकरे थेट पुरावा घेऊनच आले; म्हणाले, "त्यांना आधी बडवायचं मग...

मुंबईत राजकीय रणकंदन; विरोधकांच्या सत्याच्या मोर्चाला भाजपचे 'मूक आंदोलन' करून प्रत्युत्तर

Andhra Pradesh : एकादशीला भाविकांवर काळाचा घाला; वेंकटेश्वर मंदिरात चेंगराचेंगरी, ९ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

Satyacha Morcha Mumbai : विंडो सीट, तिकिटावर ऑटोग्राफ...वाहतूककोंडी टाळण्यासाठी राज ठाकरेंचा खास लोकलने प्रवास

उद्योग वाढीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना जादा अधिकार देणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा