महाराष्ट्र

बैल पोळ्यानिमित्ताने जळगावात ढोलताशांच्या कडकडाटात मिरवणुका! विदेशी विद्यार्थ्यांसह भूमिपुत्रांनी धरला ठेका

विजय पाठक

विजय पाठक/जळगाव :

आदिवासी पारंपरिक देवदानी होळी नृत्य… शौर्यवीर ढोलताशांचा कडकडाट,… संबळ वाद्यावर सालदारांचे नृत्य,…सनई-चौघाड्यांच्या वाद्यासह.. सर्जा-राजा म्हणजे कृषीसंस्कृतीते मोलाचे स्थान असलेल्या वृषभ राजाची निघालेली भव्य मिरवणूक ही जळगावातील पोळा सणाचे पारंपरिक महत्त्व अधोरेखित करीत होती. या पोळा उत्सवात विदेशी विद्यार्थ्यांसह भूमिपुत्रांनी ठेका धरला होता. यावेळी शहरातील मान्यवर व शालेय विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. पोळा फोडण्याचा मान जैन हिल्स येथील सालदार गडी हंसराज जाधव यांनी मिळवला. सलग तिसऱ्यांदा मिळवून हॅट‌्ट्रिक साधली.

जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडच्या जैन हिल्सच्या कृषी विभागातर्फे गेल्या २८ वर्षांपासून पोळा सण साजरा करण्यात येतो.

सालदारगडींचा सपत्नीक सन्मान

जैन इरिगेशनच्या कृषी विभागाचे काम विविध साईटवर चालते. श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी, वर्षभर शेतात राबणाऱ्यांचा सन्मान करण्याची प्रथा आहे. २८ सालदार गडी आणि ३० हून अधिक बैलजोडी काळ्या मातीमध्ये राबत असतात. त्या सर्व सालदारगडींचा भेटवस्तू देऊन सपत्नीक गौरव करण्यात आला. डोक्यावर बांबू व मोर पीसाचा टोप.. कंबरेवर घुंगरूचा पट्टा बांधून विशिष्ट पद्धतीने मांदल, ढोलकी, तुडतुडी, थाळी, तुमळी, टिमकीवर बुध्या, बावा काली मिरक्या आदिवासी देवदानी नृत्य यावेळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. शौर्यवीर ढोल पथकातील १२० युवक-युवतींचे तालबद्ध वादन आणि गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी नंदीनृत्यावर जल्लोष केला. सालदारांनीही संबळावर नृत्याविष्कार सादर करून आनंद व्यक्त केला.

Jammu Kashmir Election : नंदनवनात आज अखेर मतदान; २४ जागांसाठी २१९ उमेदवार रिंगणात

One Nation, One Election ची अंमलबजावणी कधी? केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे मोठे विधान

सुप्रीम कोर्टाने रोखला 'बुलडोझर न्याय'! आमच्या परवानगीशिवाय एकही पाडकाम नको; पुढील सुनावणीपर्यंत आदेश

सगेसोयरे अधिसूचनेवर सरकारनियुक्त समित्यांचे काम सुरू; कोणत्याही समाजाची फसवणूक करणार नाही - मुख्यमंत्री

विधानसभा निवडणुकीची आचार संहिता कधी लागू होणार? गिरिश महाजनांनी वर्तवले भाकीत