महाराष्ट्र

मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यास विरोधी पक्षांचा विरोध ;पुण्याच्या अलका चौकातून दाखवणार काळे झेंडे

या आंदोलनाचे नियोजन करण्यासाठी पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये विरोधीपक्ष आणि सामाजिक संघटनांच्या बैठकीचं नियोजन करण्यात आलं आहे

नवशक्ती Web Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पूरस्कार जाहीर झाला आहे. १ ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पूरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार ज्या संस्थेकडून दिला जातो. त्या संस्थेचे विश्वस्थ काँग्रेस नेते रोहित टिळक हे आहेत. मात्र, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार गट), शिवसेना(ठाकरे गट) यांच्यासह अनेक सामाजिक संघटनांकडून मोदींना हा पूरस्कार देण्यास विरोध होत आहे. त्यामुळे या संघटनेकेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काळे झेडे दाखवण्यात येणार आहेत.

डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वात विरोधी पक्षाकडून मोदींना हे काळे झेंडे दाखवण्यात येणार आहेत. या आंदोलनाचे नियोजन करण्यासाठी पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये विरोधीपक्ष आणि सामाजिक संघटनांच्या बैठकीचं नियोजन करण्यात आलं आहे. पुण्यातल्या अलका चौकात मोदींना काळे झेंडे दाखवण्यात येणार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस नेते सुशिलकुमार शिंदे हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असले तरीही त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्याकडून मोदींना हे काळे झेंडे दाखवण्यात येणार आहेत. तसंच मोदींच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे.

पुणे शहरात दरवर्षी लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येतो. टिळकांचा इतिहास हा स्वातंत्र्य काळाच्या अगोदरपासून काँग्रेस सोबत जोडला गेला आहे. असं असुनही प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रोहीत टिळक यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पूरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांची आणि लोकमान्यांची विचारसरणी जुळत नाही, त्यामुळे त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यास विरोध करणार असल्याचं काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलं आहे.

शरद पवार उपस्थित राहणार?

हा पुरस्कार १ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात येणार आहे. त्यामुळे १ ऑगस्ट रोजी त्यांचं आगमन होणार आहे.लोकमान्य टिळक स्मारक समिती ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टिळक यांनी या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आमंत्रित केलं आहे. शरद पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचा दावा देखील रोहीत टिळक यांनी केला आहे. यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

सावत्र भावांना बहिणींनी जोडा दाखवला - मुख्यमंत्री

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

तुष्टीकरणाला उत्तर कसे द्यायचे हे महाराष्ट्राने दाखवले - मोदी