महाराष्ट्र

एल्विश यादववरुन विरोधकांचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा ; म्हणाले, "एल्विश सारख्या विषारी नशाबाजांना..."

नोएडा पोलिलांनी विषारी रेव्ह पार्टी आयोजित केल्याप्रकरणी एल्वीश यादव व त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा नोंद केला असून त्यांच्याकडे जिवंत विषारी साप सापडले आहेत

नवशक्ती Web Desk

बिग बॉस ओटीटी -२ विजेता एल्विश यादव हा चर्चेत आला आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोएडातील रेव पार्टीवरील छापेमारीदरम्यान एल्विश यादवसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोएडा पोलिसांनी आत्तापर्यंत तीन राज्यांत छापेमारी केली आहे. एल्विश यादव या गणपतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर आल्यावर आला होता. यावेळी त्याने गणपतीची आरती देखील केली होती. आता त्याचे फोटो शेअर करत विरोधी नेत्यांनी टीका केली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर एल्विश यादव सारख्या विषारी नशाबाजांचा सुळसुळाच झाला आहे. नशाबाज तरुणांना राज्यातील तरुणांचे रोल मॉडेल बनवण्यात हातभार लावत आहेत का? असा सवाल राज्याच्या विधान सभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान गुन्हेगारांसाठी पर्यटनस्थळ झाले आहे का? असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर एल्विश यादव सारख्या नशाबाजांचा सुळसुळाट झाला आहे. शाल नारळ देऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आदरतिथ्य करण्यात आलं होतं. त्याच्यावर सापाच्या विषापासून ड्रग्ज बनवणे, सेवन करणे आणि विकणे यासारखा गंभी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलांबाबत अपशब्द वापरणारा, विषारी ड्रग्जचं सेवन आणि विक्री करणाऱ्या आरोपीचे आदरतिथ्य करुन मुख्यमंत्री एल्विश यादन सारख्या नशाबाज तरुणांना राज्यातील तरुणांचं रोल मॉडेल बनवण्यात हातभार लावला जातो आणि इथे वर्षावर नशाबाज आरती करतो हे महायुती सरकार आहे.

दरम्यान, काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी देखील याप्रकरणी संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान गुन्गहेगारांसाठी पर्यटनस्थळ झालं आहे का? एकनाथ शिंदे साहेबांच्या काळात विषारी सापांच्या विषाच्या रेव्ह पार्ट्या आयोजित करणाऱ्या एल्विश यादव सारख्या टुकार युट्यूबरला विशेष आमंत्रण देऊन गणपती आरतीला बोलावलं होतं. आता नोएडा पोलिलांनी विषारी रेव्ह पार्टी आयोजित केल्याप्रकरणी एल्वीश यादव व त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा नोंद केला असून त्यांच्याकडे जिवंत विषारी साप सापडले आहेत. यापुर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पुण्यातील कुख्यात गुंड बाबा बोडकेंचे वर्षा बंगल्यावरील फोटो आले होते. अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? असं म्हणत अतुल लोंडे यांनी संताप व्यक्त केला आहे.

Maratha Reservation : सलग तिसऱ्या दिवशी वाहतूक विस्कळीत; CSMT परिसरात आंदोलकांचे बस्तान

Maratha Reservation: आंदोलनाची धग वाढणार; मनोज जरांगे आजपासून पाणी पिणेही बंद करणार; एकतर विजययात्रा, नाहीतर अंत्ययात्रा

Maratha Reservation : दक्षिण मुंबईत आज पुन्हा कोंडीची शक्यता

Maratha Reservation : CSMT परिसरात अस्वच्छता; राज्यभरातून अन्नपदार्थांचा ओघ वाढल्याने नासाडी

Maratha reservation protest : सुप्रिया सुळेंना आंदोलकांचा घेराव; गाडीवर बाटल्या भिरकावल्या