पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा परिणाम: अटारी-वाघा सीमा बंद  एएनआय
महाराष्ट्र

शॉर्ट टर्म व्हिसावर १७ पाकिस्तानी उल्हासनगरात; पोलीस यंत्रणा ‘अलर्ट मोड’वर, उद्यापर्यंत भारतातून बाहेर पडण्याचे आदेश

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात सुरक्षा यंत्रणांनी सतर्कता वाढवली असताना, उल्हासनगर शहरातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Swapnil S

उल्हासनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात सुरक्षा यंत्रणांनी सतर्कता वाढवली असताना, उल्हासनगर शहरातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. उल्हासनगरमध्ये १७ पाकिस्तानी नागरिक शॉर्ट टर्म व्हिसावर वास्तव्यास असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने युद्धपातळीवर हालचाली करत या नागरिकांना २८ एप्रिलपर्यंत भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या शोध मोहिमेदरम्यान हा प्रकार उघडकीस आला असून, शहरातील सुरक्षा व्यवस्थेला नवे आव्हान निर्माण झाले आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, देशभरात सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. याच अनुषंगाने उल्हासनगर परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हासनगर, विठ्ठलवाडी, अंबरनाथ आणि बदलापूर या चारही शहरांमध्ये पोलिसांनी विशेष शोधमोहीम राबवली. तपासणी दरम्यान फक्त उल्हासनगर शहरातच १७ पाकिस्तानी नागरिक शॉर्ट टर्म व्हिसावर वास्तव्यास असल्याचे समोर आले आहे. त्यापैकी काहींच्या वास्तव्यात अनियमितता असल्याचेही निष्पन्न झाले आहे. यामुळे प्रशासनाने तातडीने पावले उचलत सर्व १७ नागरिकांना २८ एप्रिलपर्यंत भारतातून परत जाण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.

अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये तपासणी केली असता, कोणताही पाकिस्तानी नागरिक आढळून आलेला नाही. मात्र उल्हासनगरमध्ये एकाच वेळी मोठ्या संख्येने पाकिस्तानी नागरिक राहत असल्याचे समजताच, सुरक्षा यंत्रणांनी सतर्कता वाढवली आहे. पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “शॉर्ट टर्म व्हिसावर आलेल्या नागरिकांनी ठरलेल्या मुदतीमध्ये परत जाणे बंधनकारक आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.” तसेच उल्हासनगर शहरात कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस विभागाने कडेकोट बंदोबस्त वाढवला आहे. याशिवाय पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, आपल्या परिसरात कोणतीही संशयास्पद व्यक्ती आढळल्यास किंवा वावरताना काही शंका आल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी, जेणेकरून सुरक्षेला कोणतीही बाधा पोहोचणार नाही. सध्या उल्हासनगर शहरात याप्रकरणी कमालीची सतर्कता बाळगली जात असून, पोलीस यंत्रणा दिवस-रात्र ‘अलर्ट मोड’वर कार्यरत आहे.

देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही. उल्हासनगरात १७ पाकिस्तानी नागरिक शॉर्ट टर्म व्हिसावर वास्तव्यास असल्याचे आढळल्यावर तातडीने कठोर पावले उचलण्यात आली आहेत. संबंधित सर्व नागरिकांना २८ एप्रिलपर्यंत देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोणतीही संशयास्पद हालचाल वा व्हिसा अटींचा भंग केल्यास कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनी आपल्या परिसरात संशयित हालचाली दिसल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी, जेणेकरून शहराची शांतता आणि सुरक्षितता अबाधित राहील. - सचिन गोरे, पोलीस उपायुक्त, उल्हासनगर परिमंडळ ४

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक