महाराष्ट्र

Palghar Rape Case : पालघर हादरलं! काळी जादू असल्याचं सांगत पतीच्या पाच मित्रांकडून महिलेवर वारंवार अत्याचार

या पाचही आरोपींवर भारतीय दंड संहिता कलम ३७६(बलात्कार) ३७६(N)(एकाच महिलेवर वारंवार बलात्कार केल्याचा गुन्हा) ४२०(फसवणूक) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवशक्ती Web Desk

पालघर जिल्ह्यांत एका ३५ वर्षीय महिलेवर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेच्या घरातील वास्तू चुका आणि काळ्या जादूद्वारे इतर वाईट जादू दूर करण्याचं आश्वासन देऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केल्यापारकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात आरोपी असलेले पाचही जण ते पीडित महिलेच्या पतीचे मित्र आहेत. त्यांनी पीडितेला तिच्या पतीवर वाईट जादू टाकण्यात आली आहे. शांतता परत मिळवण्यासाठी तिला काही विधींचा भाग बनवावं लागेल, असं सांगितलं.

२०१८ च्या एप्रिल महिन्यापासून पीडिच्या घरी आरोपींनी वारंवार यायला सुरवात केली. पीडित महिला एकटी असताना ते तिच्याकडून विधी करत. यावेळी ते महिलेला पंचामत नावाचं पेय देऊन तिच्यावर बलात्कार करायचे. घरात शांतता, समृद्धी आणि तिच्या पतीवा स्थिर नोकरी मिळू शकेल, असं सांगून आरोपींनी महिलेकडून सोनं आणि पैसे देखील उकळल्याचं देखील समोर आलं आहे. महिलेवर २०१९ मध्ये ठाण्यातील येऊर जंगलात बलात्कार झाला. त्यानंतर कांदिवलीतील मुख्य आरोपीच्या मठात आणि लोणावळ्यातील एका रिसॉर्टमध्ये पीडितेवर बलात्कार करण्यात आला. त्यांनी तिच्याकडून २.१० लाख रुपयांसह सोनं घेतलं.

११ सप्टेंबर रोजी महिलेने फिर्याद दिल्यानंतर पोलिसांच्या पथकाने रवींद्र भाटे, दिलीप गायकवाड, गौरव साळवी, महेंद्र कुमावत आणि गणेश कदम यांना या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. ही पद्धती या आरोपींनी इतरांवर देखील वापरली आहे का ? याबाबतचा शोध घेत असल्याचं तलासरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक विजय मुतडक यांनी सांगितलं.

या पाचही आरोपींवर भारतीय दंड संहिता कलम ३७६(बलात्कार) ३७६(N)(एकाच महिलेवर वारंवार बलात्कार केल्याचा गुन्हा) ४२०(फसवणूक) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवायि इतर अमानवी, वाईट आणि अघोरी प्रथा आणि काळा जादू कायदा २०१३ अंतर्गत देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

GST आता फक्त ५ आणि १८ टक्के; नवीन दराचा ‘घट’ २२ सप्टेंबरपासून

मराठा आरक्षणाच्या जीआरवरून OBC नेत्यांमध्ये मतमतांतरे; जीआर प्रत फाडत लक्ष्मण हाके यांचे आंदोलन; भुजबळांचा कोर्टात जाण्याचा इशारा

Maratha Reservation Protest : सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसान भरपाईचे काय? उच्च न्यायालयाचा मराठा आयोजकांना सवाल

Mumbai : २३८ एसी लोकल खरेदीला मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४८२६ कोटींची मान्यता

कोकणातून परतणाऱ्या गणेशभक्तांचे हाल; मुंबई-गोवा महामार्गावर ३ किमीपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा