वाघरीच्या जाळ्यात अडकलेले खवले मांजर; सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडल्यानंतर जाताना.  
महाराष्ट्र

Karad : वाघरीतल्या खवल्या मांजराची सुटका; नैसर्गिक अधिवासात सुखरुप रवानगी

कराडपासून जवळ असलेल्या मुंढे (ता. कराड) येथे ॲड. हणमंतराव जमाले यांच्या घरानजीक असलेल्या शेतात कोंबडी संरक्षणासाठी लावलेल्या वाघरीच्या जाळ्यात अडकलेल्या खवल्या मांजराची वन विभागाच्या पथकाने सुखरूप सुटका केली. त्यानंतर या दुर्मिळ सस्तन प्राण्याला तपासणीअंती सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

Swapnil S

कराड : कराडपासून जवळ असलेल्या मुंढे (ता. कराड) येथे ॲड. हणमंतराव जमाले यांच्या घरानजीक असलेल्या शेतात कोंबडी संरक्षणासाठी लावलेल्या वाघरीच्या जाळ्यात अडकलेल्या खवल्या मांजराची वन विभागाच्या पथकाने सुखरूप सुटका केली. त्यानंतर या दुर्मिळ सस्तन प्राण्याला तपासणीअंती सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

वाघरीच्या जाळ्यात अडकलेले खवले मांजर; सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडल्यानंतर जाताना.

गुरुवारी रात्री ते शुक्रवारी पहाटेच्या दरम्यान ही घटना घडली. शुक्रवारी सकाळी ॲड. जमाले यांना त्यांच्या शेतातील वाघरीच्या जाळ्यात खवले मांजर अडकल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने वन विभागाला माहिती दिली. त्यानंतर वनपाल आनंद जगताप यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, खवले मांजर वाघरीत अडकले असल्याचे दिसले. रात्रभर स्वतःला सोडवण्याचा त्याने प्रयत्न केल्याचेही खुणा आढळल्या.

वाघरीच्या जाळ्यात अडकलेले खवले मांजर; सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडल्यानंतर जाताना.

वन विभागाच्या पथकाने काळजीपूर्वक जाळी कापून खवले मांजराची सुटका केली. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी केली असता ते मादी असून अंदाजे वय दोन वर्षे आणि वजन ९.१३० किलो असल्याचे निष्पन्न झाले. प्राणी सुस्थितीत असल्याचे प्रमाणित झाल्यानंतर त्याला जंगलातील सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले.

खवल्या मांजराचे दर्शन झाल्यास तत्काळ वन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन कराडच्या वनक्षेत्रपाल ललिता पाटील यांनी केले आहे.

Women’s World Cup : ऐतिहासिक विजेतेपदाचे लक्ष्य; भारत-दक्षिण आफ्रिका महिला संघांत आज अंतिम लढत

Mumbai : एल्फिन्स्टन पूलाचे पाडकाम आज रात्रीपासून

Maharashtra Rain : पाऊस सुरूच राहण्याची शक्यता

Satyacha Morcha Mumbai : मविआचा एल्गार; उद्धव, राज, शरद पवार यांच्यासह विरोधकांचे शक्तिप्रदर्शन

Satyacha Morcha : मुंबईत सत्याचा जयघोष! सीएसएमटी स्थानक परिसर घोषणांनी दणाणला; हजारोंच्या संख्येने पक्षांचे कार्यकर्ते सहभागी