(Photo - X/@Pankajamunde) 
महाराष्ट्र

मराठ्यांना ओबीसींच्या ‘ताटातून’ आरक्षण नको - पंकजा मुंडे

मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे, याचे मी समर्थन करते, पण ते आरक्षण ओबीसींच्या ताटातून देऊ नका, कारण हे समाजघटक आधीच उपाशी आहेत, असे पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी गुरुवारी येथे सांगितले.

Swapnil S

छत्रपती संभाजीनगर : मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे, याचे मी समर्थन करते, पण ते आरक्षण ओबीसींच्या ताटातून देऊ नका, कारण हे समाजघटक आधीच उपाशी आहेत, असे पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी गुरुवारी येथे सांगितले.

बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथे दसऱ्याच्या निमित्ताने आयोजित सभेत त्या बोलत होत्या. पंकजा मुंडे म्हणाल्या, गोपीनाथ मुंडे यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आणि आम्हीही त्याच्या बाजूने आहोत, पण ते आमच्या ताटातून घेऊ नका, माझा समाज आज उपाशी आहे, लोकांचे संघर्ष पाहून मला झोप लागत नाही. मी कधीही निवडणुकीत प्रचार करताना लोकांची जात विचारात घेतली नाही, मी ती दुर्लक्षित केली आणि नेहमी माणुसकीला प्राधान्य दिले, असे त्या म्हणाल्या.

पूरग्रस्तांना आश्वासन

राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासनही त्यांनी दिले. पूर आणि झालेल्या नुकसानीनंतरही राज्यभरातून लोक येथे सभेला आले. पूरस्थितीत जातीय सीमा कोसळल्या आणि लोक एकमेकांच्या मदतीला धावले. आता अशीच समाजव्यवस्था आणि नेतृत्व उभे करण्याची गरज आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने मी आश्वासन देते की, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील आणि त्यांना मनापासून मदत करेल, असे त्या म्हणाल्या.

Mumbai : मूर्ती कोसळून २ ठार; भुलेश्वरमध्ये गणेश आगमन सोहळ्यातील दुर्घटना

पवारांची तिरकी चाल! मित्रपक्ष घायाळ!

आजचे राशिभविष्य, २४ ऑगस्ट २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

सतत बसून काम केल्याने कंबरदुखीचा त्रास? 'हे' उपाय ठरतील फायदेशीर

Shravan Special : बाजारातील मिठाई नको, फुटाण्यांपासून घरच्या घरी बनवा स्वादिष्ट पेढे; रेसिपी अगदी सोपी