महाराष्ट्र

कागदी तिकिट हद्दपार होणार ; वर्षांला अडीच कोटींची बेस्ट बचत

बसची वाट बघत तासन् तास थांब्यावर थांबा, सुट्ट्या पैशांवरुन प्रवासी व वाहक यांच्यात उडणारी शाब्दिक चकमक यावर तोडगा

नवशक्ती Web Desk

चलो अँप, स्मार्ट कार्ड, मोबाईलवर तिकिट डाऊनलोड करणे या डिजिटल तिकीट प्रणालीला प्रवाशांनी पसंती दिली आहे. आतापर्यंत ४७ लाखांहून अधिक प्रवाशांनी मोबाईल तिकिटींगला पसंती दिली आहे.

त्यामुळे लवकरच बेस्ट उपक्रमाच्या बसेस मधून कागदी तिकिट हद्दपार होणार आहे. यामुळे कागदी तिकीटावर वर्षांला अडीच कोटींच्या खर्चाची बचत होत असून, खिशात तिकिट संभाळा, रांगेत उभे राहण्याची प्रवाशांची गैरसोय दूर झाली आहे. त्यामुळे पेपर लेस तिकिटावर भर दिला असून भविष्यात बेस्ट बसचा प्रवास तिकिट लेस होणार आहे. दरम्यान, अधिकाधिक प्रवाशांनी डिजिटल तिकीट प्रणालीचा वापर करावा, असे आवाहन बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी केले आहे.

बसची वाट बघत तासन् तास थांब्यावर थांबा, सुट्ट्या पैशांवरुन प्रवासी व वाहक यांच्यात उडणारी शाब्दिक चकमक यावर तोडगा काढण्यासाठी बेस्ट उपक्रमाने डिजिटल तिकीट प्रणालीवर भर दिला आहे. प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करुन देणाऱ्या बेस्ट उपक्रमाने प्रवाशांच्या सेवेत वातानुकूलित बसेस रस्त्यावर आणल्या आहेत. प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासह पर्यावरणाच्या संवर्धनासाठी बेस्ट उपक्रमाने पुढाकार घेत इलेक्ट्रीक वातानुकूलित बस बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात दाखल केल्या आहेत. यामुळे प्रवाशांचा गारेगार प्रवास होत असून, डिजिटल तिकीट प्रणालीमुळे तिकिटासाठी रांगेत उभे राहण्याची कटकट दूर झाली आहे. तसेच मोबाईल, स्मार्ट कार्ड या डिजिटल तिकीट प्रणालीमुळे सुट्ट्या पैशांवरून होणारा वाद ही संपुष्टात आला आहे. डिजिटल तिकीट प्रणालीचा वापर करणाऱ्या प्रवाशांसाठी सवलतीच्या दरात तिकीट उपलब्ध करुन देण्यात येत असून, प्रवासी ही डिजिटल तिकीट प्रणालीला पसंती देत असल्याचे लोकेश चंद्र यांनी सांगितले.

बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात सध्या ३,३२८ बसेस असून, दररोज ३५ लाख प्रवासी प्रवास करतात. या मध्ये डिजिटल तिकीट प्रणालीचा वापर करण्यास प्रवासी पुढाकार घेत आहेत. डिजिटल तिकीट प्रणालीत नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध होत असून, टॅप इन टॅप आऊट मध्ये मोबाइल मधील ब्लूटूथ सुरू ठेवल्यास अँटोमॅटिक तिकिट डाऊनलोड होते. यामुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच टॅप इन टॅप आऊट ही सुविधा पुढील काही दिवसांत सगळ्या बसमध्ये उपलब्ध करणार असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, डिजिटल तिकीट प्रणालीचा वापर अधिकाधिक प्रवाशांनी करावा यासाठी सणासुदीच्या काळात विशेष ऑफर देण्यात येते.

डिजिटल तिकीट प्रणालीत अनेक सवलती

सुपर सेव्हर प्लॅन, प्रत्येक ६ रुपये पर्यंतच्या फेऱ्यासाठी

फेऱ्या - दिवस - पैसे - बचत

२ - एक दिवस - १२ रुपयांचे तिकीट ९ रु. - ३ रु.बचत

४ - एक दिवस - २४ रुपयांचे तिकीट १५ रु. - ९ रु. बचत

१० - दोन दिवस - ६० रुपयांचे तिकीट २८ रु. - ३२ रु. बचत

१० - ८४ दिवस - ६० रुपयांचे तिकीट ५० रु. - १० रु. बचत

१५ - ७ दिवस - ९० रुपयांचे तिकीट ५९ रु. - ३१ रु. बचत

३० - ८४ दिवस - १८० रुपयांचे तिकीट १३५ रु. - ४५ रु. बचत

५० - ८४ दिवस - ३०० रुपयांचे तिकीट २१० रु. - ९० रु. बचत

६० - २८ दिवस - ३६० रुपयांचे तिकीट २१९ रु. - १४१ रु. बचत

१०० - २८ दिवस - ६०० रुपयांचे तिकीट २७९ रु. - ३२१ रु. बचत

१५० - २८ दिवस - ९०० रुपयांचे तिकीट २७९ रु. ६०१ रु. बचत

डिजिटल तिकीट प्रणालीला पसंती

-स्मार्ट कार्डचा रोजचा वापर - ४ लाख २५

-मोबाईलवर रोज तिकिट धारक - १ लाख २५

-आतापर्यंत स्मार्ट कार्डचा वापर ७ लाख ३० हजार

-मोबाईलचा वापर करणारे एकूण प्रवासी - ४७

वातानुकूलित व विना वातानुकूलित प्रवासाची सुविधा!

बेस्ट उपक्रमाने मुंबईकरांसाठी डिजिटल तिकीट प्रणाली अधिक आकर्षक बनवण्यासाठी नवीन बस पास योजना ७ एप्रिलपासून अंमलात आणली आहे. यात सुपर सेव्हर प्लॅन्स, विद्यार्थी पास, अमर्यादित राइड पास आणि ज्येष्ठ नागरिकांचे पास नव्या स्वरूपात आणले आहेत. या नवीन योजना प्रवासी वातानुकूलित आणि विना वातानुकूलित अशा दोन्ही बसेसमधून कोणत्याही योजनेसह प्रवास करू शकतात.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

‘बटेंगे तो कटेंगे’, ओबीसीने भाजपला तारले