महाराष्ट्र

पाटणची उमेदवारी घराणेशाहीच्या बाहेर; संजय राऊत यांची टीका

Maharashtra assembly elections 2024 : ज्यांना शिवसेनेने आमदार केले, मंत्री केले, महत्त्वाची खाती दिली, त्यांनी गद्दारी केली. जिराफाने गद्दारी केल्यामुळे पाटणची उमेदवारी घराणेशाहीच्या बाहेर गेली असल्याची कडवी टीका शिवसेना उबाठा पक्षाचे नेते संजय राऊत यांनी केली.

Swapnil S

कराड : ज्यांना शिवसेनेने आमदार केले, मंत्री केले, महत्त्वाची खाती दिली, त्यांनी गद्दारी केली. जिराफाने गद्दारी केल्यामुळे पाटणची उमेदवारी घराणेशाहीच्या बाहेर गेली असल्याची कडवी टीका शिवसेना उबाठा पक्षाचे नेते संजय राऊत यांनी केली.

पाटण विधानसभेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तथा महाविकास आघाडीचे उमेदवार भानुप्रताप उर्फ हर्षद मोहनराव कदम यांच्या प्रचारार्थ कोपरखैरणे, मुंबई येथे प्रचार सभा पार पडली. यावेळी खासदार संजय राऊत यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांच्यावर निशाणा साधला. पाटण विधानसभा मतदारसंघातील हजारो मतदार नोकरी, माथाडी कामगार, व्यापार, व्यवसायाच्या निमित्ताने मुंबई, नवी मुंबई व ठाणे परिसरात वास्तव्यास आहेत. मात्र त्यांचे नाव पाटण विधानसभा मतदारसंघात मतदार म्हणून असल्याने शिवसेनेने नवी मुंबईसह मुंबई, ठाणे येथे एक एक प्रचार सभा पार पडली जात आहे. त्यानुसार ही सभा पार पडली.

यावेळी काँग्रेसचे सातारा जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, शिवसेना सातारा जिल्हा उपप्रमुख रवींद्र पाटील, तालुकाप्रमुख सचिन आचरे, सुरेश पाटील, सतीश काळगावकर, संजय सकपाळ, रामचंद्र पवार उपस्थित होते.

विघ्नहर्त्याचे राज्यात आगमन; सर्वत्र उत्साहाचे वातावरण

भारत-पाकिस्तानने एकमेकांची ७ विमाने पाडली; ट्रम्प यांचा नवा दावा, दोन्ही देशांमधील अणुयुद्ध थांबविल्याचाही पुनरुच्चार

सशस्त्र दलांनी दीर्घ संघर्षासाठी तयार राहावे; संरक्षणमंत्र्यांचे मोठे विधान

मुंबईत एसी इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी सेवा सप्टेंबरपासून; गेटवे ऑफ इंडिया ते जेएनपीए प्रवास होणार जलद

जरांगे मुंबईकडे रवाना; मराठा आरक्षणासाठी आरपारची लढाई