महाराष्ट्र

Poladpur : गळफास घेऊन आत्महत्या

तालुक्यातील पितळवाडी गावातील इसमाने दारूच्या नशेत घरातील बेडरूममध्ये लोखंडी पाइपला साडी बांधून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली.

Swapnil S

पोलादपूर : तालुक्यातील पितळवाडी गावातील इसमाने दारूच्या नशेत घरातील बेडरूममध्ये लोखंडी पाइपला साडी बांधून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली.

मयत काशिनाथ शंकर चव्हाणला (५९) दारूचे अतिव्यसन होते. दारूच्या नशेत त्याने घरातील बेडरूममधील लोखंडी पाइपला साडी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी ठाण्यात सागर काशिनाथ चव्हाण याच्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पोलीस हवालदार नितेश कोंढाळकर हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत आहेत.

याप्रकरणी पोलीस अधिक तपास क‌रत आहे. तसेच आत्महत्या की हत्या याबाबत पोलिसांनी शोधकार्य सुरू केले आहे. त्यामुळे आगामी काळात याचा उलगडा होईल.

Mumbai : ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषा अन् नववर्षाचा जल्लोष; मुंबई, ठाणे, डोंबिवलीत गुढीपाडव्याच्या भव्य शोभायात्रा

Air Travel Alert : प्रवाशांनो लक्ष द्या! 'या' ४ विमानतळांवर बंदी; फ्लाइट्सवर होणार परिणाम

अक्षय्य तृतीयेपूर्वी सोन्याचे दर वाढण्याची शक्यता; ग्राहकांच्या खरेदी धोरणावर परिणाम होणार

Nagpur : मॅट्रिमोनियल साईटवरील ओळख महागात पडली; मॉर्फ अश्लील व्हिडिओने ३६ वर्षीय व्यक्तीला ब्लॅकमेल

भिवंडीत फर्निचर मार्केटला भीषण आग; अनेक दुकाने जळून खाक, सुदैवाने जीवितहानी टळली