महाराष्ट्र

युवा संघर्ष यात्रेवर पोलिसांचा लाठीचार्ज; रोहित पवार भडकले

सरकारकडून निवेदन स्वीकारायला कोणीही आलं नाही. त्यामुळे रोहित पवार हे आक्रमक झाल्याचं दिसून आले.

नवशक्ती Web Desk

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटातील नेते रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेचा आज नागपूर येथे समारोप झाला. नागपूरच्या टेकडी परिसरात या यात्रेची समारोप सभा आयोजित करण्यात आली होती. महाविकास आघाडीतील सर्व बड्या नेत्यांनी या समारोप सभेला हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. या सभेनंतर तरुणांचा विराट असा मोर्चा रोहित पवार यांनी थेट विधान भवनावर नेला. यावेळी पोलिसांकडून रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा अडवण्यात आली. यानंतर मात्र या यात्रेतील तरुण आक्रमक झाले. समारोप सभेनंतर रोहित पवार यांनी युवकांसमवेत विधानभवनावर धडक दिल्याने पोलिसांनी त्यांना मध्येचं अडवलं.

रोहित पवार यांच्या नेतृत्वातील ही यात्रा हजारो तरुणांना घेऊन विधान भवनावर धडकल्याने पोलिसांनी यात्रा अडवली. यावेळी पोलिसांनी रोहित पवार यांना ताब्यात घेतलं. मात्र, रोहित यांनी यावेळी रस्त्यावर ठिय्या मांडल्याने त्यांना पोलिसांनी खासगी वाहनातून नेलं. रोहित पवार यांनी निवेदन स्वीकारण्यासाठी सरकारला अल्टिमेटम दिला होता. मात्र, सरकारकडून निवेदन स्वीकारायला कोणीही आलं नाही. त्यामुळे रोहित पवार हे आक्रमक झाल्याचं दिसून आले.

रोहित पवार संतापले-

गेल्या दोन महिन्यांपासून जवळपास ८०० किमीचा प्रवास करुन महाराष्ट्रातल्या युवकांचे प्रश्न, आरोग्य, शेती अशा अनेक प्रश्नांना घेवून घेऊन ही यात्रा नागपूर येथील विधान भवनात पोहोचली होती. नागपूर येथेच या यात्रेचा समारोप करण्यात आला होता. मात्र, सरकारने पोलीस बळाचा वापर करत या यात्रेला मध्येच अडवल्याने रोहित पवार आक्रमक झाले. शेतकऱ्यांच्या गरिबांच्या पोरांवर लाठीचार्ज करत आहात. ही कसली दडपशाही आहे? सरकारला चर्चा करायला काय होतं. आमदारांची हो परिस्थिती आहे, तर गरीब लोकांची काय परिस्थिती असेल? अशी संतप्त प्रतिक्रिया रोहित पवार यांनी यावेळी दिली.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी