Photo : X (Praful Patel)
महाराष्ट्र

युतीचा विचार डोक्यातून काढा - प्रफुल्ल पटेल

युतीचा विचार डोक्यातून काढून टाकला पाहिजे, युतीचे जमले तर केले पाहिजे, नाही जमले तर सोडून दिले पाहिजे. हे असे आमचे धोरण ठरले आहे. कारण सगळीकडे युती होऊ शकत नाही, असे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी तिरोडा येथे कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना सांगितले.

Swapnil S

गोंदिया : युतीचा विचार डोक्यातून काढून टाकला पाहिजे, युतीचे जमले तर केले पाहिजे, नाही जमले तर सोडून दिले पाहिजे. हे असे आमचे धोरण ठरले आहे. कारण सगळीकडे युती होऊ शकत नाही, असे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी तिरोडा येथे कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना सांगितले.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. या मेळाव्यात प्रफुल पटेल यांनी कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्यासाठी सज्ज होण्याचे आदेश दिले असून, त्यांना खास कानमंत्रही दिला आहे.

प्रफुल्ल पटेल म्हणाले, प्रभागामध्ये आपल्याकडे उमेदवार असेल. युतीतील सर्व घटक पक्षांकडे उमेदवार असतील तरी आपल्या पक्षातल्या उमेदवाराला संधी न देणे, दुखावणे हे मला योग्य वाटत नाही, म्हणून जिथे सोयीचे वाटेल तिथे युती बघू. नगराध्यक्षाच्या एखाद्या निवडणुकीमध्ये सगळ्यांच्या मतदानाची आवश्यकता पडते. त्यामुळे एखाद्यावेळी विचार करू, त्यामध्येही खात्री मी देत नाही.

Mumbai : डेंग्यू, मलेरियाच्या आजाराने स्थायी समिती तापली; अपुरे मनुष्यबळ, फॉगिंग मशीनमुळे सदस्य संतप्त

­शिक्षणानंतरही नोकरीची शाश्वती नाही; पुण्यात हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केली खंत

जयपूरमध्ये शाळेच्या पाहणीदरम्यान CJP कार्यकर्त्यांवर हल्ला; धक्काबुक्की अन् गाड्यांची तोडफोड, Video व्हायरल

Mumbai : कुर्ल्यात पहाटे मोठी दुर्घटना! क्रेनचा भाग झोपड्यांवर कोसळला; ३ महिन्यांच्या बाळासह १० जण जखमी, VIDEO

ठाण्यातील कोलशेतमध्ये धूळ-माती, चिखलाचा कहर; बड्या विकासकांना महापालिकेचा दणका, नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा