ANI
महाराष्ट्र

सुविधा न देणारे हॉटेल-मोटेल थांबे रद्द करा; परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचे एसटी प्रशासनाला आदेश

लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान एसटी बस थांबत असलेल्या हॉटेल-मोटेल थांब्यावर प्रवाशांना सुविधा मिळत नसतील तर असे थांबे रद्द करण्याचे निर्देश परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी प्रशासनाला दिले आहेत.

Swapnil S

मुंबई : लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान एसटी बस थांबत असलेल्या हॉटेल-मोटेल थांब्यावर प्रवाशांना सुविधा मिळत नसतील तर असे थांबे रद्द करण्याचे निर्देश परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी प्रशासनाला दिले आहेत. थांब्याचे सर्वेक्षण करून अहवाल १५ दिवसात सादर करण्याच्या सूचनादेखील महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना केल्या आहेत.

तक्रारीची दखल घेऊन सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला धोरण स्वीकारण्याची निर्देश दिले आहेत. राजकीय दबावाला बळी न पडता प्रवाशांच्या आरोग्याची कोणती तडजोड न करता संबंधित हॉटेल-मोटेल थांब्यावर कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी यावेळी दिले आहेत. सध्या संपूर्ण राज्यभरात सुरू असलेल्या हॉटेल-मोटेल थांब्याचे नव्याने सर्वेक्षण करून तेथील प्रवासी सुविधांची चाचपणी करावी. जे थांबे प्रवाशांना योग्य सुविधा देत नसतील त्यांच्यावर कारवाई करावी व नव्या थांब्यांना मंजुरी द्यावी. तसेच याबाबतचा सविस्तर अहवाल १५ दिवसात आपल्याला सादर करावा असे निर्देशित त्यांनी दिले आहेत.

प्रवाशांच्या तक्रारी

लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान एसटी बसेस विविध हॉटेल-मोटेल थांब्यावर थांबतात. तेथे प्रवाशांना चहा -नाष्टा अथवा जेवण तसेच नैसर्गिक विधीसाठी वेळ दिला जातो. परंतु अनेक हॉटेलमधील थांब्यांबाबत प्रवाशांच्या तक्रारी येत असून प्रामुख्याने प्रसाधनगृहे अस्वच्छ असणे, फराळाचे जिन्नस शिळे, अशुद्ध व महाग असणे, याचबरोबर संबंधित हॉटेलमधील कर्मचारी व मालकांची वर्तणूक एस टी प्रवासांच्या सोबत अत्यंत वाईट असणे अशा प्रकारच्या तक्रारी उद्भवत आहेत.

तुमच्याही मोबाईलवर अचानक मोठा इमर्जन्सी अलर्ट आला? घाबरू नका; सरकारकडून देशभरात चाचणी सुरू, वाचा सविस्तर माहिती

Mumbai : ‘नीट’ परीक्षेमुळे मध्य रेल्वेचा रविवारचा ब्लॉक रद्द; शनिवारी मेगाब्लॉक, रात्री ११.१६ वाजता CSMTहून शेवटची लोकल

जनगणना दोन टप्प्यात! नागरिकांनी डिजिटल पद्धतीने स्व-गणना करावी; राज्यपाल, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘जनगणना-२०२७’चा शुभारंभ

Nashik : कुंभमेळा विकासकामे मार्च २०२७ पूर्वी पूर्ण होणार; जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे प्रतिपादन

Mumbai : पूर्व व पश्चिम द्रुतगती मार्ग खड्डेमुक्त; टिकाऊ रस्त्यांसाठी ‘मायक्रो सर्फेसिंग’ तंत्रज्ञानाचा वापर