राहुल गांधी (संग्रहित छायाचित्र)
महाराष्ट्र

सोयाबीनला देणार ७ हजार रुपये भाव; राहुल गांधी यांचे ट्विट

Maharashtra assembly elections 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुती व महाविकास आघाडीमध्ये जोरदार चुरस आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मविआने जोरदार आवाज उठवायला सुरुवात केली आहे. राज्यात मविआचे सरकार स्थापन झाल्यास सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ७ हजार रुपये भाव दिला जाईल, अशी घोषणा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘एक्स’वर ट्विट करून केली आहे.

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुती व महाविकास आघाडीमध्ये जोरदार चुरस आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मविआने जोरदार आवाज उठवायला सुरुवात केली आहे. राज्यात मविआचे सरकार स्थापन झाल्यास सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ७ हजार रुपये भाव दिला जाईल, अशी घोषणा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘एक्स’वर ट्विट करून केली आहे.

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सत्तेत येताच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना क्विंटलला ७ हजार रुपये दर देण्याचा पहिला निर्णय घेतला जाईल. मविआ सरकारचा हा ऐतिहासिक निर्णय असेल, असे गांधी यांनी स्पष्ट केले आहे.

राज्यातील सोयाबीन, कांदा, कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. गेल्या तीन निवडणुकांत सोयाबीन उत्पादकांना सहा हजार रुपये भाव दिला जाईल, असे भाजपने सांगितले. मात्र आजही सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना तीन ते चार हजार रुपये दर मिळण्यासाठी झगडावे लागते. भाजप सरकारकडून शेतकऱ्यांना फक्त आश्वासन दिले जाते. प्रत्यक्षात काहीच देत नाही, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी भाजपवर केला आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येताच सोयाबीन कापूस उत्पादक कांदा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य तो भाव देईल, असा विश्वास त्यांनी एक्सवर ट्विट करत व्यक्त केला आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक