महाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यातील दोन विस्तारित मेट्रो मार्गांचे उद्घाटन

या विस्तारित मार्गांमुळे पुणेकरांचा प्रवास अधिक सुसह्य होणार

नवशक्ती Web Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी पुण्यातील दोन विस्तारित मेट्रो मार्गांचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये 'वनाज ते रुबी हॉल' आणि 'सिव्हिल कोर्ट ते पिंपरी-चिंचवड मुख्यालय' या मार्गांचा समावेश आहे. या विस्तारित मार्गांमुळे पुणेकरांचा प्रवास अधिक सुसह्य होणार आहे.

गरवारे कॉलेज ते रुबी हॉल आणि फुगेवाडी ते शिवाजी नगर दिवाणी न्यायालय या दोन विस्तारित मार्गांचे पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केले. यापूर्वी वनाज ते गरवारे कॉलेज मार्ग आणि पिंपरी ते फुगेवाडी या मार्गाचे उद्घाटन वर्षभरापूर्वी खुद्द मोदींनी केले होते. यामध्ये वनाज ते दिवाणी न्यायालय हा 8 कि.मी. या मार्गाला 22 मिनिटे लागतील. तर पिंपरी ते दिवाणी न्यायालय हा 25 किमीचा प्रवास आहे.

भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर परतले; चारही अंतराळवीरांसह कॅलिफोर्नियातील समुद्रात लँडिंग,भारतासाठी अभिमानाचा क्षण

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

अखेर जयंत पाटलांचा राजीनामा; शशिकांत शिंदेंकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा

आता मेट्रो गर्दीचे आव्हान

दिव्यांग कल्याण मंत्रालयालाच सहाय्याची गरज!