महाराष्ट्र

पुण्यातील पब, बार, रेस्टॉरंट, हॉटेल्स रात्री दीड वाजेपर्यंत सुरू राहणार

हॉटेल आणि पबमालकांनी नियमांचे पालन केल्यास पोलीस कोणत्याही प्रकारे अडथळा निर्माण करणार नाहीत, असे आश्वासन पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पब आणि बार मालकांना बैठकीनंतर दिले आहे. मात्र...

Swapnil S

पुणे : पुण्यातील पब, बार, रेस्टॉरंट आणि हॉटेल्स रात्री दीड वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. हॉटेल आणि पबमालकांनी नियमांचे पालन केल्यास पोलीस कोणत्याही प्रकारे अडथळा निर्माण करणार नाहीत, असे आश्वासन पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पब आणि बार मालकांना बैठकीनंतर दिले आहे. मात्र कोणत्याही प्रकारच्या हुक्क्याला पुण्यात बंदी असेल.

महानगरांची नाईट लाईफ ज्यांच्यावर अवलंबून असते ते पब, बार आणि रेस्टॉरंट एकाचवेळी सरकारसाठी उत्पन्नाचा मोठा स्रोत असतात तर दुसरीकडे गैरप्रकार रोखण्यासाठी या पब आणि बारवर पोलिसांनी बारीक नजर ठेवणे आवश्यक असते. अनेकदा पब आणि बारमालकांकडून नियमांचे उल्लंघन केल्याचा दावा करत पोलिसांकडून कारवाई करण्यात येते तर पोलीस जाणीवपूर्वक त्रास देत असल्यानं व्यावसायावर परिणाम होत असल्याची पब आणि बार मालकांची तक्रार असते. यावर उपाय शोधण्यासाठी पुण्यातील पब, बार आणि हॉटेल व्यावसायिकांची पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीत पुण्यातील पब, बार आणि सर्व प्रकारची हॉटेल्स पूर्वीप्रमाणे दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास इथून पुढे देखील परवानगी असणार आहे.

पोलीस आयुक्त्यांच्या या भूमिकेमुळे अनेकदा स्थानिक पोलिसांकडून होण्याऱ्या विनाकारण त्रासाला आळा बसेल, असे पबमालकांना वाटत आहे. मात्र रात्री दीड वाजेपर्यंत पब आणि रेस्टाॅरंट सुरू ठेवताना पब आणि रेस्टॉरंटमालकांना नियमांचे पालनही करावे लागेल.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी