महाराष्ट्र

Pune Accident : कोरेगाव पार्क परिसरात भीषण दुर्घटना; भरधाव कारची मेट्रोच्या खांबाला जोरदार धडक, गाडीचे झाले तुकडे, २ भावांचा जागीच मृत्यू |Video

पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात रविवारी (दि. २) पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्घटना बंड गार्डन मेट्रो स्टेशनजवळ पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली.

नेहा जाधव - तांबे

पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात रविवारी (दि. २) पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्घटना बंड गार्डन मेट्रो स्टेशनजवळ पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. मृतांमध्ये २ चुलत भावांचा मृत्यू झाला तर १ जण गंभीर रित्या जखमी झाला आहे. या अपघातात कारची धडक इतकी जोरदार होती, की कारचे अक्षरश: तुकडे झाले. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.

नियंत्रण सुटल्याने भीषण धडक

या अपघातात पुढच्या सीटवर बसलेल्या ऋतिक भंडारे आणि यश भंडारे या दोन चुलत भावांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा मित्र कुशवंत टेकवणी गंभीर जखमी झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, काळ्या रंगाची एमएच २४ डीटी ८२९२ ही कार अतिवेगात होती. कारचं नियंत्रण सुटल्याने ती रस्त्याच्या डिव्हायडरला धडकली आणि थेट मेट्रोच्या सिमेंटच्या खांबावर जाऊन आदळली. धडक इतकी भीषण होती की गाडीचे अक्षरशः तुकडे झाले.

हँड ब्रेकमुळे नियंत्रण सुटल्याचा अंदाज

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गाडीचा हँड ब्रेक अचानक ओढल्याने वाहनाचे नियंत्रण सुटल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गाडी भाड्याने घेतली असल्याचंही प्राथमिक चौकशीत समोर आलं आहे.

फॉरेन्सिक तपास आणि CCTV पुरावे

घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. फुटेजमध्ये गाडीचा वेग अत्यंत जास्त असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. फॉरेन्सिक टीमलाही घटनास्थळी बोलावण्यात आलं आहे. अपघाताच्या वेळी गाडीत अल्कोहोल किंवा अंमली पदार्थांचा वापर झाला होता का, याचीही तपासणी केली जाणार आहे.

ठाणे स्थानकाच्या विस्तारीकरणाला प्रारंभ; १५ डब्यांच्या लोकलसाठी फलाटांची लांबी वाढविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

“२० वर्षांपासूनचं स्वप्न अखेर साकार; तुम्ही फक्त वर्ल्डकप नव्हे, तर..."; विश्वविजेत्या भारतीय संघासाठी मिताली राजची इमोशनल पोस्ट

इतिहास रचला! भारताच्या महिला क्रिकेटपटूंनी प्रथमच विश्वचषक जिंकला; दक्षिण आफ्रिकेला चारली धूळ

कोइंबतूर एअरपोर्टजवळील धक्कादायक घटना; कॉलेजच्या विद्यार्थिनीचे अपहरण करून तिघांनी केला गँगरेप; प्रियकरालाही केली मारहाण

'कोणीतरी मराठी अभिनेत्री आहे, पण जोपर्यंत रंगेहाथ पकडत नाही...'; गोविंदाच्या अफेअरच्या चर्चांवर नेमकं काय म्हणाली पत्नी सुनीता?