मुंबई : हडपसर येथील डंपिंग ग्राऊंडमुळे पुणे विमानतळावर येणाऱ्या आणि जाणाऱ्या विमानांना ‘बर्ड हिट’चा धोका असल्याचा दावा अमान्य करत हे डंपिंग ग्राऊंड अन्यत्र हलवण्याची विनंती मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.
मुख्य न्या. आलोक आराधे आणि न्याा. संदीप मारणे यांच्या खंडपीठाने कचरा डेपोच्या रॅम्प व प्रकल्पांमधून येत असलेल्या दुर्गंधीकडे पालिका आणि कॅन्टोन्मेंटकडून दुर्लक्ष होणार नाही. तसेच डेपोवरील २८ एकरच्या मोकळ्या जागेवरील डंपिंग तत्काळ बंद करावी, असे निर्देश पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि पुणे महापालिकेला दिले.
या डंपिंगमुळे विमानतळ परिसरात पक्ष्याची संख्या वाढली असून या पक्षांमुळे अपघात होण्याची शक्यता असल्याचा दावा करत निखिल शहा व इतर काही नागरिकांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती.