महाराष्ट्र

पुणे : बोपदेव घाटात तरुणीवर सामूहिक बलात्कार; पोलिसांकडून संशयित आरोपींचे स्केच जारी

पीडित मुलगी मूळची सुरत येथील असून तिचा मित्र जळगाव येथील राहणारा आहे. दोघेही एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. ती आणि तिचा मित्र गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास बोपदेव घाटामध्ये गेले होते.

Swapnil S

पुणे : गेल्या काही दिवसांत पुण्यात महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आता पुण्यातील बोपदेव घाटात मित्राबरोबर फिरायला गेलेल्या एका २१ वर्षीय तरुणीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडल्याने पुण्यात खळबळ माजली आहे.

ही घटना गुरुवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. मात्र, अत्याचार करणारे कोण होते याचा तपास अद्याप लागू शकलेला नाही. पोलिसांना पीडित तरुणी आणि तिच्या मित्राने दिलेल्या माहितीच्या आधारे संशयित आरोपींचे स्केच जारी केले आहेत. या आरोपींबाबत काहीही माहिती असल्यास पोलिसांनी जनतेला खालील क्रमांकांवर माहिती देण्याचे आवाहन केले आहे: 8691999689 (विनय पाटणकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कोंढवा पोलिस स्टेशन), 8275200947/9307545045 (युवराज हांडे, पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा), आणि युनिट 5 02026122880 (नियंत्रण कक्ष, पुणे शहर पोलीस).

पीडित मुलगी मूळची सुरत येथील असून तिचा मित्र जळगाव येथील राहणारा आहे. दोघेही एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. ती आणि तिचा मित्र गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास बोपदेव घाटामध्ये गेले होते. त्यावेळी तीन अज्ञात तरुणांनी त्यांना अडवले व जबरदस्तीने या मुलीला येवलेवाडीजवळ नेले. तेथे तिच्यावर त्यांनी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर तरुणीला खडी मशीन चौकात सोडून ते पसार झाले.

या घाटात रात्रीच्यावेळी कोणीच नसते. घडलेल्या घटनेमुळे घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या पीडित मुलीला तिच्या मित्राने एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तिची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पोलीस ठाण्याला साधारणपणे शुक्रवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास यासंदर्भात रूग्णालयाकडून माहिती कळविण्यात आली. त्यानंतर आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी