महाराष्ट्र

एकमेकांशी ओळख, पैशांचा वाद; गाडेच्या वकिलांचा दावा; रुपाली पाटील ठोंबरेंचीही पोस्ट आली चर्चेत

Pune bus rape case: आरोपी दत्तात्रय गाडे आणि पीडित मुलगी एकमेकांना एक महिन्यांपासून ओळखत होते. दोघांमध्ये जे झाले ते संगनमताने झाले. दोघांमध्ये पैशांचा वाद झाला होता. त्यानंतर दत्तात्रय गाडे पळून गेला नव्हे तर तो त्याच्या गावी गेला होता. मात्र गावाला पोलीस छावणीचे रूप आल्याने...

Krantee V. Kale

पुणे : आरोपी दत्तात्रय गाडे आणि पीडित मुलगी एकमेकांना एक महिन्यांपासून ओळखत होते. दोघांमध्ये जे झाले ते संगनमताने झाले असून बलात्कार झाला नसल्याचा दावा गाडेच्या वकिलांनी केला आहे. ते दोघे एकाच बसमधून खाली उतरले, ते बसमधून कोठे गेले? याची माहिती घेण्यात यावी. या दोघांमध्ये पैशांचा वाद झाला होता. त्यानंतर दत्तात्रय गाडे पळून गेला नव्हे तर तो त्याच्या गावी गेला होता. मात्र गावाला पोलीस छावणीचे रूप आल्याने तो लपून बसला, अशी माहितीही वकिलांनी न्यायलयात दिली.

पुण्यातील स्वारगेट बसस्थानकांत उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय मुलीवर बलात्कार करून नंतर पसार झालेल्या दत्तात्रय गाडे याला गुरुवारी रात्री त्याच्या गुनाट गावातून अटक करण्यात आली. गाडेच्या वकिलांप्रमाणेच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनीही याचप्रकारची सोशल मीडिया पोस्ट केली आहे.

“बस स्टँड घटनेत, पुणे नाहकच बदनाम झाले. ऐका संमतीच्या संबंधात व्यवहाराचे पैसे दिले नाही, म्हणून याचे प्रचंड खेद वाटतो. दुसरे बसस्टँड आगार व्यवस्थापनाचा भोंगळ कारभार बाहेर आला. आता त्यांना सुट्टी नाही. नोकरीवर काम चोख करा, नाहीतर घरी बसा कायमचे. तूर्तास एवढेच,” असे त्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे.

बघा पोस्ट -

एसटी महामंडळात आयपीएस अधिकारी नेमणार - माधुरी मिसाळ

पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकात घडलेल्या घटनेच्या निमित्ताने महिलांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. ह्या अनुषंगाने आजच्या बैठकीत त्याचा विस्तृत आढावा घेण्यात आला असून येथील सुरक्षा कर्मचारी वाढविण्यासोबतच एसटी महामंडळात एक सुरक्षारक्षक कमिटी नेमून त्यात आयपीएस दर्जाचा सुरक्षा अधिकारी नेमणार असल्याचे परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस