महाराष्ट्र

पुणे : मंगलदास बांदल ईडीच्या जाळ्यात; १६ तासांच्या चौकशीनंतर अटक

Swapnil S

पुणे : पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) १६ तासांच्या चौकशीनंतर ईडीने अटक केली. सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने मंगळवारी मंगलदास बांदल यांच्या शिरूर आणि पुण्यातील निवासस्थानांवर छापेमारी केली होती. यात मंगलदास बांदल यांच्या निवासस्थानी कोट्यवधी रुपयांचे घबाड सापडले आहे. तसेच पाच आलिशान गाड्या आणि एक कोटी किमतीची चार मनगटी घड्याळे ही आढळून आली आहेत या चौकशीनंतर ईडीने बांदल यांना अटक केली आहे.

यामुळे पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे माजी सभापती असलेल्या बांदल यांच्या पुण्यातील महम्मदवाडी, शिक्रापूर आणि बुरुंजवाडी (ता.शिरूर) येथील निवासस्थानांवर ईडीच्या पथकाने मंगळवारी छापे टाकले. यामध्ये बांदल यांच्या दोन्ही निवासस्थानी ५ कोटी ६० लाख रुपयांची रक्कम आढळून आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानंतर मंगलदास बांदल यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. याशिवाय त्यांच्याकडे पाच अलिशान कार, एक कोटींची चार घड्याळेही जप्त करण्यात आली आहेत.

ईडीने तब्बल १६ तास कारवाई केली होती. यावेळी मंगलदास बांदल यांची कसून चौकशीही करण्यात आली. तसेच शिक्रापूर येथील घरी बांदल यांच्या पत्नी रेखाताई बांदल, दोन भाऊ आणि त्यांच्या कुटुंबियांची चौकशी करण्यात आली.

तर, महंमदवाडी येथील बंगल्यात राहत असलेल्या मंगलदास बांदल यांची देखील ईडी अधिकाऱ्यांनी चौकशी केली. ईडीच्या या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यांना मुंबईच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Jammu Kashmir Election : नंदनवनात आज अखेर मतदान; २४ जागांसाठी २१९ उमेदवार रिंगणात

One Nation, One Election ची अंमलबजावणी कधी? केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे मोठे विधान

सुप्रीम कोर्टाने रोखला 'बुलडोझर न्याय'! आमच्या परवानगीशिवाय एकही पाडकाम नको; पुढील सुनावणीपर्यंत आदेश

सगेसोयरे अधिसूचनेवर सरकारनियुक्त समित्यांचे काम सुरू; कोणत्याही समाजाची फसवणूक करणार नाही - मुख्यमंत्री

विधानसभा निवडणुकीची आचार संहिता कधी लागू होणार? गिरिश महाजनांनी वर्तवले भाकीत