Pune : बनावट कॉल सेंटरवर ईडीची कारवाई 
महाराष्ट्र

Pune : बनावट कॉल सेंटरवर ईडीची कारवाई

अमेरिकन नागरिकांची कथित फसवणूक करणाऱ्या बनावट कॉल सेंटरच्या नेटवर्कविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पुणे, पतियाळा आणि चंदीगड येथे कारवाई केली.

Swapnil S

पुणे : अमेरिकन नागरिकांची कथित फसवणूक करणाऱ्या बनावट कॉल सेंटरच्या नेटवर्कविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पुणे, पतियाळा आणि चंदीगड येथे कारवाई केली. ईडीच्या हैदराबाद विभागीय कार्यालयाने केलेल्या या कारवाईत तीन कार्यरत बनावट कॉल सेंटर आढळून आली. त्याठिकाणी सुमारे २२० जण कार्यरत असल्याचे तपासात समोर आले.

ईडीच्या माहितीनुसार, या कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांना विविध खोट्या कारणांवरून संपर्क साधून त्यांच्याकडून पैसे उकळल्याचा आरोप आहे. कारवाईदरम्यान ६६ मोबाईल फोन, १३ लॅपटॉप, हार्ड डिस्क, इतर डिजिटल उपकरणे, रोकड आणि कागदपत्रे जप्त करण्यात आली.

या उपकरणांमध्ये कथित फसवणुकीची कार्यपद्धती, ग्राहकांची माहिती आणि पैशांच्या व्यवहारांशी संबंधित डिजिटल पुरावे आढळल्याचे ईडीने सांगितले.चंदीगडमधील एका निवासस्थानीही तपास करण्यात आला.

हे ठिकाण पतियाळातील कॉल सेंटरच्या कथित नियंत्रणासाठी वापरले जात असल्याचा ईडीचा दावा आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

FSSAI ची नेस्ले इंडियावर कायदेशीर कारवाई; नियमांचे पूर्ण पालन केल्याचा कंपनीचा दावा

मुंढवा शासकीय जमीन गैरव्यवहार प्रकरण : पार्थ पवारांविरुध्द गुन्ह्यासाठी याचिका

Ulhasnagar : स्वीकृत नगरसेवकांच्या सात जागांसाठी रणधुमाळी; न्यायालयाच्या दणक्यानंतर निवडणुकीचा बिगुल, २४ सप्टेंबरला विशेष महासभा

MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा; रोहित पवारांनी दिली सरकारला एक आठवड्याची मुदत

कुनो अभयारण्यात चित्त्याच्या चार पिलांचा जन्म