Lucknow Crime : लग्नाला नकार दिल्याने संताप अनावर; घरात घुसून तरुणीवर ॲसिड हल्ला, आई-वडिलांवर चाकूने वार

तौसिफ शाह ऊर्फ मुन्ना असे आरोपीचे नाव आहे. त्याने हुसैनगंज परिसरातील तरुणीच्या घराच्या संरक्षक भिंतीवरून उडी मारून घरात प्रवेश केला. त्यानंतर...
Lucknow Crime : लग्नाला नकार दिल्याने संताप अनावर; घरात घुसून तरुणीवर ॲसिड हल्ला, आई-वडिलांवर चाकूने वार
Lucknow Crime : लग्नाला नकार दिल्याने संताप अनावर; घरात घुसून तरुणीवर ॲसिड हल्ला, आई-वडिलांवर चाकूने वार'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

लखनऊ : लग्नाला नकार दिल्याच्या रागातून एका २५ वर्षीय तरुणाने १८ वर्षीय तरुणीवर ॲसिड फेकल्याची धक्कादायक घटना लखनऊमध्ये घडली आहे. रविवारी (दि. २९) पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आरोपीने तरुणीच्या आई-वडिलांवरही चाकूने वार केले, तर तिचा लहान भाऊ या हल्ल्यात जखमी झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तौसिफ शाह ऊर्फ मुन्ना असे आरोपीचे नाव आहे. त्याने हुसैनगंज परिसरातील तरुणीच्या घराच्या संरक्षक भिंतीवरून उडी मारून घरात प्रवेश केला. त्यानंतर त्याने तरुणीवर ॲसिड फेकले. काही माध्यमांच्या वृत्तांनुसार, तौसिफला माथेफिरू संबोधण्यात आले आहे. तरुणीने लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याने तो तिच्यावर नाराज होता. याच रागातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.

तरुणीच्या मदतीसाठी धावलेल्या कुटुंबीयांवरही हल्ला

माध्यमांच्या वृत्तानुसार, ॲसिड हल्ल्यानंतर तरुणीने आरडाओरड केली. तिचा आवाज ऐकून आई-वडील तिला वाचवण्यासाठी धावले. मात्र, आरोपीने त्यांच्यावर चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात तरुणीचा लहान भाऊही जखमी झाला.

घरातील गोंधळाचा आवाज ऐकून शेजारीही मदतीसाठी धावले. त्यांनी आरोपीला पकडून मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेत आरोपी मुन्नाही ॲसिडमुळे भाजला. तसेच, त्याने स्वतःलाही जखमी केल्याचा आरोप आहे.

तरुणीची प्रकृती गंभीर

घटनेची माहिती मिळताच रविवारी पहाटे सुमारे ५ वाजता पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपीसह पाचही जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले. सध्या सर्वांवर उपचार सुरू असून, ॲसिड हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

Lucknow Crime : लग्नाला नकार दिल्याने संताप अनावर; घरात घुसून तरुणीवर ॲसिड हल्ला, आई-वडिलांवर चाकूने वार
Mumbai : ४० वर्षांपासून एकट्याच राहत होत्या; वृद्धेच्या निधनानंतर शेजाऱ्यांनी केले अंत्यसंस्कार, मुलींना शोधण्यासाठी वृत्तपत्रात जाहिरात

लखनऊचे सहाय्यक पोलिस आयुक्त अभिषेक कुमार पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी रुग्णालयात पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले आहे. तर, पोलिस उपायुक्त अर्पित विजयवर्गीय यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगितले.

Lucknow Crime : लग्नाला नकार दिल्याने संताप अनावर; घरात घुसून तरुणीवर ॲसिड हल्ला, आई-वडिलांवर चाकूने वार
Bengaluru Mass Murder : कॅब चालकाचे भयंकर कृत्य; पत्नीसह सासरच्या सहा जणांची वरवंट्याने ठेचून निर्घृण हत्या

लग्नाला तरुणीसह आरोपीच्या कुटुंबीयांचाही विरोध

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी मुन्ना एका संगणकाच्या दुकानात काम करत होता. त्याला शेजारी राहणाऱ्या १८ वर्षीय तरुणीशी लग्न करायचे होते. तरुणी त्याची दूरची नातेवाईकही आहे. मात्र, तरुणीला या लग्नात रस नव्हता. आरोपीच्या कुटुंबीयांचाही या लग्नाला विरोध होता. लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातूनच आरोपीने हे कृत्य केल्याचा आरोप आहे.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)