कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे 
महाराष्ट्र

मृत्यूच्या क्षणीही मैत्री कायम राहिली! कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांचं पार्थिव पुण्यात आणलं

जम्मू-काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील व्यावसायिक कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे हे दोघे अगदी जीवाभावाचे मित्र. दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम. संतोष जगदाळे हे न चुकता कौस्तुभ गणबोटे यांच्या दुकानात गप्पा मारण्यासाठी येत. क्षण सुखाचा असो वा दु:खाचा दोघांनी परस्परांची साथ कधी सोडली नाही. इतकेच नव्हे तर अगदी मृत्यूच्या क्षणीही ही सोबत कायम राहिली.

Swapnil S

पुणे : जम्मू-काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील व्यावसायिक कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे हे दोघे अगदी जीवाभावाचे मित्र. दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम. संतोष जगदाळे हे न चुकता कौस्तुभ गणबोटे यांच्या दुकानात गप्पा मारण्यासाठी येत. क्षण सुखाचा असो वा दु:खाचा दोघांनी परस्परांची साथ कधी सोडली नाही. इतकेच नव्हे तर अगदी मृत्यूच्या क्षणीही ही सोबत कायम राहिली. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात या दोघांचा करुण अंत झाला असला तरी त्यांच्या दोस्तीची कहाणी अनेकांच्या डोळय़ात पाणी आणत आहे.

आठ दिवसापूर्वी संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे हे त्यांच्या दुकानात बसले होते आणि तिथेच त्यांचा काश्मीर ट्रिपचा प्लॅन बनला. यामध्ये कौस्तुभ गणबोटे, त्यांच्या पत्नी तसेच संतोष जगदाळे, त्यांच्या पत्नी आणि मुलगी, असे काश्मीरला जाण्याचे निश्चित झाले. खरेतर कौस्तुभ गणबोटे हे अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून पुढे आले होते. त्यांचा फरसाणचा व्यवसाय असल्याने कामानिमित्त ते बाहेर जायचे. मात्र फिरण्यासाठी ते कधीच पुण्याच्या बाहेर गेले नाहीत. संतोष जगदाळे आणि गणबोटे यांची जुनी मैत्री होती. तसे ते समवयस्क. फरसाणच्या व्यवसायाच्या निमित्ताने त्यांच्यात अधिक जवळीक निर्माण झाली हाेती. गणबोटे यांचे वय ५६, तर जगदाळे यांचे वय ५४ होते. जगदाळे त्यांच्या दुकानात येऊन बसत. तिथे एकमेकांचे सुख-दु:ख ते शेअर करत. गणबोटे पहिल्यांदा पुण्याच्या बाहेर गेले आणि त्यातच करुण अंत झाला.

कौस्तुभ गणबोटे यांची आई त्यांच्या लहानपणी गेली. त्यांच्या काकीने त्यांचा सांभाळ केला. त्यांना दोन बहिणी असून, त्यातील एक अपंग आहे. त्या बहिणीचा सांभाळ त्यांनी केला. दुसऱ्या बहिणीचे लग्न केले असून, दोघीही आता चांगल्या स्थिरस्थावर झाल्या आहेत. कौस्तुभ यांच्या मुलाचे मध्यंतरी लग्न झाले. दोन महिन्यापूर्वीच ते आजोबा झाले. त्यामुळे ते अतिशय आनंदात होते. आता मी जबाबदारीतून मोकळा झालो असून, यापुढे मनसोक्त फिरणार, असे ते म्हणायचे. खरेतर गणबोटे यांनी त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी रात्रंदिवस कष्ट उपसले. कधी स्वतःसाठी वेळ दिला नाही. मात्र, जेव्हा वेळ दिला, तेव्हा काळाने त्यांच्यावर आणि त्यांच्या जीवलग मित्रावरही घाला घातला.

पुण्यातील रास्ता पेठ येथे कौस्तुभ गणबोटे राहत होते, तर कर्वेनगर येथे संतोष जगदाळे राहायला होते. जगदाळेंचे एकुलत्या एक एमबीए झालेल्या उच्चशिक्षित मुलीच्या लग्नाचे, तर गनबाेटे यांचे नातवाचे बारसे करण्याचे स्वप्न अधुरे राहिले असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

पार्थिव पुण्यात आणले, आज अंत्यसंस्कार

जम्मू-काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा मृत्यू झाला असून, त्यांचे पार्थिव विशेष विमानाने आज सकाळी श्रीनगरमधून पुण्यात आणण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असून अंतिम निरोप देण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

चीनकडून नव्या डावपेचांची आखणी

मुंबई धोक्याच्या पातळीवर

जुलै महिना कसा जाईल? बघा तुळ आणि वृश्चिक राशीचे भविष्य