पुणे पुन्हा हादरले! जुन्नरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून; मुलीचा शोध घेण्याचा आरोपीने केला बनाव 
महाराष्ट्र

पुणे पुन्हा हादरले! जुन्नरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून; मुलीचा शोध घेण्याचा आरोपीने केला बनाव

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे एका नऊ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या पाशवी कृत्यानंतर आरोपीने गावकऱ्यांबरोबर बेपत्ता मुलीचा शोध घेण्याचे ढोंगही केले...

Swapnil S

पुणे : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे एका नऊ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या पाशवी कृत्यानंतर आरोपीने गावकऱ्यांबरोबर बेपत्ता मुलीचा शोध घेण्याचे ढोंगही केले. पोलिसांसोबत बसून सीसीटीव्ही फुटेज तपासत असताना अतिशहाणपणा दाखवून ‘बघा बघा, मी सीसीटीव्हीमध्ये दिसतोय,’ असे स्वतःच पोलिसांना सांगणे त्याच्यावर उलटले. त्याच्या याच एका चुकीमुळे आणि पोलिसी खाक्यामुळे अवघ्या काही तासांतच याचा उलगडा झाला.

आरोपीचे नाव साहील खैरे असे असून तो कामानिमित्त पिंपळवंडी येथे बहिणीच्या घरी राहण्यासाठी आला होता. बहिणीच्या घराजवळच राहणाऱ्या गरीब कुटुंबातील ९ वर्षांच्या मुलीशी त्याची ओळख झाली.

घटनेच्या दिवशी चिमुरडीला कांजण्या आल्या असल्यामुळे ती शाळेत गेली नसल्याने ती घरी एकटीच होती. तिचे आई-वडील शेतात मजुरीच्या कामासाठी गेले होते. घरात चिमुरडीला एकटे पाहून साहीलने मुलीला सायकल शिकवण्याचा बहाणा केला आणि तिला सायकलवरून घरापासून दीड किलोमीटर अंतरावर निर्जन उसाच्या शेतात नेऊन अत्याचार केला. तिची हत्या करून तिचा मृतदेह लपवून ठेवला.

दरम्यान, सीसीटीव्ही तपासल्यानंतर पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर मुलीवर अत्याचार करून हत्या केल्याची कबुली दिली आणि मृतदेह लपवलेली जागा दाखवली. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको केले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

तीन रखडलेले पूल ऑक्टोबर महिन्यात सेवेत; सायन पुलाची डेडलाइन पुन्हा हुकली, विद्याविहार गोरेगाव-चित्रनगरी उड्डाणपूल अंतिम टप्यात

Thane : एसटीचे 'आवडेल तेथे कोठेही प्रवास पास' आता ऑनलाइन; चार आणि सात दिवसांचे पास घरबसल्या काढता येणार

Thane : पूर्णेकर हत्या प्रकरणी सत्ताधारी -विरोधक आमने-सामने; निष्पक्ष तपासाची आरोप-प्रत्यारोपांना धार

Mumbai : ठाकरे बंधूंचा आज गर्जना मोर्चा

Mumbai : वांद्रे-सी लिंक ते गोरेगाव आता सुसाट; ५० मिनिटांचा प्रवास १५ मिनिटांत, उन्नत मार्ग दीड वर्षांत पूर्ण होणार