खडकवासला धरणावर पारंपरिक जलपूजन X | @MDNagpure
महाराष्ट्र

Pune : खडकवासला धरणातून २७ हजार क्युसेक विसर्ग; नदीपात्रातील रस्ते बंद, झाड कोसळल्याने वाहतुकीवर परिणाम

खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर पुणे महानगरपालिकेच्या वतीने बुधवारी खडकवासला धरण येथे पारंपरिक पद्धतीने जलपूजन सोहळा उत्साहात पार पडला. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव नदीपात्राच्या दोन्ही बाजूंचे रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.

Swapnil S

पुणे : खडकवासला धरण साखळीत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बुधवारी दुपारी खडकवासला धरणातून २७ हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे मुठा नदी दुथडी भरून वाहू लागली असून नदीकाठच्या सखल भागांना पुराचा फटका बसला आहे. सिंहगड रस्त्यावरील एकतानगर परिसरातील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी धावपळ उडाली.

दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव नदीपात्राच्या दोन्ही बाजूंचे रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. पुणे शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चार ते पाच दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे.

खडकवासला धरणावर पारंपरिक जलपूजन

पुणे : खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर पुणे महानगरपालिकेच्या वतीने बुधवारी खडकवासला धरण येथे पारंपरिक पद्धतीने जलपूजन सोहळा उत्साहात पार पडला.

खडकवासला धरणावर पारंपरिक जलपूजन

जलदेवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साडी, चोळी आणि नारळ अर्पण करण्यात आले. तसेच पुणेकरांना वर्षभर अखंड व पुरेसा पाणीपुरवठा व्हावा आणि शहरावर पाणीटंचाईचे संकट ओढवू नये, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : रुस्तमजी क्राऊनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी हातोडा; सहाव्या मजल्यावरील फ्लॅटमधील अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त

नारीशक्तीने रोखला शहापूर-मुरबाड-खोपोली महामार्ग; प्रशासनाच्या निषेधार्थ खड्डेमय महामार्गावर साजरी केली मंगळागौर

क्षेपणास्त्र तंत्रज्ञान खासगी उद्योगांना हस्तांतरित; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मंजुरी

कांदा एक्स्प्रेस आज दिल्लीत पोहचणार; ८०० टनाची पहिली खेप, ग्राहक व्यवहार सचिव निधी खरे यांची माहिती

...तर MSME चा निधी पुरवठा ठप्प होईल; ‘एफआयएसएमई’ची भीती; RBI चा NBFC च्या कर्जावर नियंत्रणाचा विचार