संग्रहित छायाचित्र 
महाराष्ट्र

पुणे-कोल्हापूर एक्स्प्रेसवर दगडफेक करुन महिलेचे मंगळसूत्र लंपास, कोरेगाव रेल्वे स्थानकावरील धक्कादायक प्रकार

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथे पुणे-कोल्हापूर-पुणे या रेल्वेच्या विशेष एक्स्प्रेसमधील महिला प्रवाशाच्या गळ्यातील सोन्याचे ७५ हजार रुपयांचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने खिडकीतून हिसकावून लंपास केले.

Swapnil S

कराड : सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथे पुणे-कोल्हापूर-पुणे या रेल्वेच्या विशेष एक्स्प्रेसमधील महिला प्रवाशाच्या गळ्यातील सोन्याचे ७५ हजार रुपयांचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने खिडकीतून हिसकावून लंपास केले. या प्रकरणी महिला प्रवाशाने आरडाओरडा केल्यानंतर चोरट्याने लोको पायलटवर दगडफेक करून अंधारात पलायन केले. याबाबत मिरज रेल्वे पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना कोरेगाव रेल्वे स्थानकावर घडली.

रेल्वेच्या पुणे-कोल्हापूर-पुणे विशेष एक्स्प्रेसमधून धर्मादेवी हरिहरनाथ विश्वकर्मा (५८) या महिला प्रवासी कुटुंबातील सदस्यांसमवेत कोल्हापूर येथे अंबाबाईच्या दर्शनासाठी निघाल्या होत्या. रात्रीच्या सुमारास एक्स्प्रेसला कोरेगाव रेल्वेस्थानकावर थांबविण्यात आले. याचाच फायदा घेत अज्ञात चोरट्याने धर्मादेवी विश्वकर्मा यांच्या गळ्यात हात घालून सोन्याचे मंगळसूत्र खेचून नेले. विश्वकर्मा यांनी आरडाओरडा करताच त्यांचा मुलगा सतीश हा झोपेतून उठला. त्याने एक्स्प्रेसमधील साखळी ओढल्यानंतर लोको पायलटने प्रसंगावधान राखत एक्स्प्रेस जागेवर थांबवली. एक्स्प्रेस थांबल्याचे पाहून प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या तीन चोरट्यांपैकी दोघा चोरट्यांनी चालकांच्या दिशेने दगडफेक केली व अंधाराचा फायदा घेऊन प्लॅटफॉर्मवरून ते तिघेजण पसार झाले. सोमवारी मध्यरात्रीनंतर साधारण १ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास कोरेगाव रेल्वे स्थानकावर हा प्रकार घडला.

याबाबत मिरज रेल्वे पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सतिश हरिहरनाथ विश्वकर्मा यांनी फिर्याद दिली आहे.

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणी प्राध्यापक निलंबित; 'त्या' निवेदनावरून संस्थेची माफी

Mumbai : ‘बटरफ्लाय’ रोखणार पाणी गळती; जलवाहिन्यांवर बटरफ्लाय झडपा बसवणार, गणेश खणकर यांच्या मागणीची दखल

Mumbai : चौपाटी, विसर्जनस्थळी चोख व्यवस्थापन; देशभरातील तज्ज्ञांकडून पालिका, पोलिसांचे कौतुक

गणेश विसर्जनासाठी BMC सज्ज; ३८३ कृत्रिम तलावांची व्यवस्था, ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळांवरही सुविधा, २५ हजार अधिकारी-कर्मचारी तैनात

बार्सिलोनामध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’; महाराष्ट्र मंडळ स्पेनतर्फे गणेशोत्सव, स्पॅनिश कलाकारांचाही सहभाग